शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरच्या मुलींनी फक्त वीस रुपयात बनवली मोबाईल पॉवर बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 15:58 IST

मोबाईल कुठेही चार्ज करायचे म्हटल्यावर महागडी पॉवर बँक घ्यावी लागते. परंतु आता पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी धनश्री शिंदे व यास्मीन शेख यांनी अवघ्या वीस रुपये खर्चातून मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक बनवली आहे.

ठळक मुद्देपारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी धनश्री शिंदे व यास्मीन शेख यांनी अवघ्या वीस रुपये खर्चातून मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक बनवली आहे.चार्जिंग सेलला वायर बसवून त्याचा करंट डिआरडीला देण्यात आला आहे. यास कॅपॅसिटर जोडले आहे. शिवाय चार्जरच्या पिनाही बसवण्यात आल्या आहेत.मोबाईल चार्ज होत आहे हे लक्षात यावे म्हणून एक छोटा बल्बही आतमध्ये बसवण्यात आला आहे. एका छोट्या प्लॅस्टीकच्या डब्यात हा सेट करण्यात आला आहे. सुमारे एक ते दोन तासाचा बॅकअप यात राहतो.

विनोद गोळेपारनेर : मोबाईल कुठेही चार्ज करायचे म्हटल्यावर महागडी पॉवर बँक घ्यावी लागते. परंतु आता पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी धनश्री शिंदे व यास्मीन शेख यांनी अवघ्या वीस रुपये खर्चातून मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक बनवली आहे.पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर सायन्स कॉलेज, पारनेरमध्ये अकरावी शास्त्रमध्ये धनश्री शिंदे (राळेगण थेरपाळ), यास्मीन शेख (कामरगाव) या मुली शिक्षण घेत आहेत. त्या दोघींना सहलीला जाण्यासाठी मोाबाईल चार्जरची आवश्यकता होती. त्यांनी बाजारात विचारपूस केल्यावर त्यांना खूप महागडी पॉवर बँक असल्याचे लक्षात आले. मग आपणच पॉवर बँक बनवू असे दोघींनी ठरवले. त्यासाठी बाजारात मिळणारे चार्जिंग होणारे सेल वीस रूपयांत आणले़ वाहनात असणारे चार्जरमधील डिआरडी काढला. या डिआरडीमध्ये नऊ व्होल्ट असतो. मोबाईल चार्जिंगसाठी फक्त पाच व्होल्टची गरज असते. हा डिआरडी वीज साठवून ठेवतो. त्यानंतर मोटारचे कॅपॅसिटर लावण्यात आले आहे. आणखी मार्गदर्शन विद्यार्थिनींनी प्राचार्य मुकुंद जासूद, शास्त्र विभागाचे समन्वयक बाळासाहेब करंजुले, प्रा. दळवी यांच्याकडून घेऊन मोबाईल चार्ज करणारी पावर बँक बनवली आहे. पारनेर येथे झालेल्या तालुका गणित-विज्ञान प्रदर्शनातही या दोघींनी हे उपकरण मांडले होते. त्यावेळी ते लक्षवेधी ठरले होते.

अशी बनवली पॉवर बँक

चार्जिंग सेलला वायर बसवून त्याचा करंट डिआरडीला देण्यात आला आहे. यास कॅपॅसिटर जोडले आहे. शिवाय चार्जरच्या पिनाही बसवण्यात आल्या आहेत. मोबाईल चार्ज होत आहे हे लक्षात यावे म्हणून एक छोटा बल्बही आतमध्ये बसवण्यात आला आहे. एका छोट्या प्लॅस्टीकच्या डब्यात हा सेट करण्यात आला आहे. सुमारे एक ते दोन तासाचा बॅकअप यात राहतो, असे धनश्री शिंदे व यास्मीन शेख यांनी सांगितले. शिवाय पॉवर बँकेत पुन्हा चार्ज करण्याचीही सुविधा बनवण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरMobileमोबाइल