शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या पत्नी पिछाडीवर; अजितदादा लोकसभेचा वचपा काढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:26 IST

Parner Assembly Election 2024 Result Live Updates : पारनेर मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ दाते आघाडीवर असल्याचे सुरुवातीच्या कलातून समोर आले आहे.

Parner Assembly Election 2024 Result Live Updates : पारनेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचे सुरुवातीचे कल समोर येत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी आघाडी घेतली आहे. तर शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके सध्या पिछाडीवर दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांना होमपिचवरच धक्का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांची साथ सोडून निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. लोकसभेत ते खासदार झाले. त्यानंतर शरद पवार यांनी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना विधानसभेसाठी पारनेरमधून तिकिट दिलं आहे. दरम्यान, अजित पवार यांनी 

गेल्या विधानसभेला निलेश लंके ठरले होते जायंट किलरपारनेर विधानसभा मतदारसंघात २०१९ साली लोकसभेचे सध्याचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके विजयी झाले होते. त्यांनी पारनेरमधून तीन टर्म आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या विजयराव औटी यांचा पराभव करण्याची किमया साधली होती. या निवडणुकीत निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यांना १ लाख ३९ हजार ९६३ मते मिळाली होती. तर विजयकुमार औटी यांना ८० हजार १२५ मते पडली होती.

विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट  अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे.