शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

तृप्ती देसार्इंच्या अगोदर पंकजा मुंडेंनी घेतले शनिदर्शन

By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST

पाथर्डी : शनिशिंगणापुरातील शनी चौथऱ्यावरील प्रवेशाचा वाद सुरु असताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नगर जिल्ह्यातीलच पाथर्डी शहरात शनी चौथऱ्यावर जाऊन तेल वाहिले

पाथर्डी : शनिशिंगणापुरातील शनी चौथऱ्यावरील प्रवेशाचा वाद सुरु असताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नगर जिल्ह्यातीलच पाथर्डी शहरात शनी चौथऱ्यावर जाऊन तेल वाहिले. महिलांना मंदिरात जाताना अडविता कामा नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंडे यांनी हे शनिदर्शन घेतले. यापूर्वी महिला या मंदिराच्या चौथऱ्यावर जात नव्हत्या़ त्यामुळे चौथऱ्यावर जावून शनिला तेल वाहून दर्शन घेणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.शिंगणापुरात शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा वाद गाजत असतानाच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने शिरूर तालुक्यातील पारगांव येथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या़ तेथून त्या कारने पाथर्डी मार्गे आष्टी तालुक्यातील धामणगावकडे जाताना पाथर्डी शहरातील नाथनगर येथील शनी मंदिरात दर्शनासाठी आल्या़ त्यांनी शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन शनी मूर्तीला तेल वाहिले़ या मंदिरात आजवर कोणाही महिलेने चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले नाही़ मात्र, पंकजा मुंडे यांनी ही परंपरा मोडीत काढली़ यावेळी त्यांच्यासमवेत आष्टीचे आ.भीमराव धोंडे, माजी आ.दगडू बडे, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, राहुल कारखेले, अशोक चोरमले आदी उपस्थित होते. दर्शनानंतर त्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या़ महिलांना मंदिरात जाताना अडविता कामा नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला़ त्यानंतर शनिवारी मुंडे यांनी चौथऱ्यावर जाऊन शनिचे दर्शन घेतले. या घटनेची सर्वत्र मोठी चर्चा रंगली आहे़ (तालुका प्रतिनिधी)