शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

आर्थिक मंदीशी लढण्यासाठी हवी पंचसूत्री; मोफत साईदर्शन पासेसला मर्यादा हव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 11:05 IST

सामान्य भाविकांना आनंददायी दर्शन, देणगीदारांना सन्मान, अनावश्यक खर्चात कपात, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व मनोरंजनाच्या साधनांची निर्मिती या पंचसूत्रीवर नियोजनबद्ध व कठोरपणे काम केले तरच साईसंस्थान आर्थिक मंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

प्रमोद आहेर । शिर्डी : सामान्य भाविकांना आनंददायी दर्शन, देणगीदारांना सन्मान, अनावश्यक खर्चात कपात, उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व मनोरंजनाच्या साधनांची निर्मिती या पंचसूत्रीवर नियोजनबद्ध व कठोरपणे काम केले तरच साईसंस्थान आर्थिक मंदीच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.साईसंस्थानने १९२५ मध्ये तांबे-पितळेची भांडी मोडून आरतीला चांदीचे तबक केले होते. फंड वाढवण्यासाठी चार आणे, रूपयाची तिकिटे काढून विकली, बाबांचे खराब झालेले शेले विकले, नाटकाचे प्रयोग केले, समाधीच्या सभामंडपाचे बांधकाम पैशाअभावी तेवीस वर्षे सुरू होते. कोर्ट रिसीव्हरच्या काळात पोस्टाने आलेली पाकिटे उलगडून त्याचा आतील कोरा भाग कच्च्या टिपणांसाठी वापरला जात होता. पाकिटावरील ज्या तिकीटावर शिक्का नाही ते अलगद काढून टपाल पाठवण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला होता. अशा अनेक बºयावाईट प्रसंगाना तोंड देत साईसंस्थानने केलेली काटकसर, योग्य नियोजन, भाविकांचे दातृत्व व ग्रामस्थांच्या सहकार्यातून साईसंस्थानने आर्थिक यशाचे शिखर गाठले. भाविक-देणगीदारांशी संस्थानचे संबंधसाईसंस्थानने भाविकांचे दर्शन व वास्तव्य आनंददायी होण्यासाठी त्याला समाधी स्पर्शसुख अनुभवू द्यावे.  भक्तांना त्रास दिल्यास तो अक्षम्य गुन्हा समजला जावा़ पहिल्या व तिस-या सोमवारी शताब्दी मंडपात पादुका दर्शनासाठी ठेवाव्यात, देणगीदार लहान-मोठा किंवा ओळखीचा न बघता त्याला सन्मान द्यावा. देणगीदार व संस्थान यातील मध्यस्थ कमी करून संस्थानने थेट संपर्क ठेवावा. संस्थानच्या समाजोपयोगी प्रकल्पांची माहिती देणगीदारांपर्यंत पोहचवावी. प्रकल्पामध्ये देणगीदारांचा सहभाग वाढवावा. प्रकल्पांसाठी सीएसआर फंड मिळवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. साईबाबांमुळे अनेकांचे मोठ्या व्यक्तींशी संबंध दृढ झाले आहेत, ते संस्थान व गावाच्या विकासासाठी वापरावेत. माजी विश्वस्त व अधिकाºयांना मोफत पासेसच्या मर्यादा निश्चित केल्या जाव्यात.     खर्च कपातीचे धोरण स्वीकारणे आवश्यकप्रसादालय पुन्हा सशुल्क करायला हवे. साईआश्रमचे, दर्शन-आरती पासचे दर वाढवायला हवेत. बाबांना येणाºया शालींचा नियमित लिलाव व्हावा. वाहनांचा अनावश्यक ताफा, विजेचा अनावश्यक वापर कमी करायला हवा आहे. संस्थानच्या पडीक जमिनीत भाजीपाला पिकवायला हवा. उठसुट कुणालाही मूर्ती भेट देणे टाळायला हवे. रूग्णालय व शैक्षणिक संस्थेसाठी कन्सल्टंट नियुक्त करून गुणवत्ता वाढीबरोबरच खर्च व उत्पन्नावर नियंत्रण ठेवायला हवे़ श्रमपरिहारच्या भोजनावळी बंद कराव्यात़ याशिवाय शासनाने उठसुट संस्थान तिजोरीत हात घालून  दानधर्म करण्याचा मोह काही वर्ष टाळला तरच साई संस्थानच्या आर्थिक आलेख वाढेल, असे जाणकार सांगतात.        

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिर