शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पारनेर तालुक्यातील तिर्थक्षेत्रे होणार चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 17:25 IST

पारनेर तालुक्यातील गोरेगाव, जातेगाव,रायतळे व अपधुपसह सात गावच्या तिर्थक्षेत्रांचा परिसर चकाचक होणार आहे.

सुपा : पारनेर तालुक्यातील गोरेगाव, जातेगाव,रायतळे व अपधुपसह सात गावच्या तिर्थक्षेत्रांचा परिसर चकाचक होणार आहे. सुशोभीकरण व विकासासाठी ८० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून लवकरच कामे सुरू होणार असल्याचे पारनेर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. टी. कांबळे यांनी सांगितले.गेल्या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या निधींद्वारे तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. परंतु नंतर विधानपरिषदेच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे प्रक्रिया थांबली होती. आता लवकरच प्राप्त निविदा मंजूर करून त्या त्या ठिकाणची विकास कामे सुरू होतील, असेही कांबळे यांनी सांगितले. नगर पुणे रस्त्यालगत असणाºया जातेगावच्या सुप्रसिद्ध भैरवनाथ देवस्थानसाठी पोहच रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी १० लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे. तालुक्यातील दरोडी देवस्थान विकासात तेथे पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वाधिक २० लाख रूपये खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. रायतळे येथील सद्गुरू शांतानंद आश्रमात शौचालय सुविधेसाठी १० लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. गोरेगाव,पळशी,अपधुप व चिंचोली येथील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक बसवून तो परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी १० लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे.एका तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी वर्षाला ३० लाख रूपयांपर्यंत निधीची कामे करता येत असल्याचे कांबळे यांनी सांगितले. वाघुंडे येथील श्री दत्त देवस्थान व वाळवणे येथील श्री भैरवनाथ देवस्थनचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश आहे. या दोन्ही तिर्थक्षेत्रांना गेल्यावर्षी निधी मिळाला नाही. दोन्ही ठिकाणांचा विकास आराखडा तयार केल्याचे वाळवणे येथील भैरवनाथ देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष सचिन पठारे व वाघुंडेचे सरपंच संदीप मगर यांनी सांगितले. सर्व प्रस्तावांची पूर्तता करूनही निधी मात्र मिळाला नसल्याने या दोन्ही गावातील ग्रामस्थ व भाविकांनी नाराजी व्यक्त करीत आगामी आर्थिक वर्षात तरी निधी मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.पारनेर तालुक्यातील मंजूर झालेल्या सात गावांच्या तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांची निविदा प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण होऊन लवकरच कामास सुरूवात होईल.-आर. टी. कांबळे, शाखा अभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती,पारनेर.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर