शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकऱ्यांचा लघुपट इस्त्राईलला

By admin | Updated: August 10, 2016 00:23 IST

श्रीरामपूर : कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कष्टकरी समाजातील १६ मुलांना एकत्र करून तयार झालेला ‘द मॅसेज आॅफ सॅल्व्हेशन’ हा लघु चित्रपट थेट इस्त्राईलमध्ये प्रदर्शित होणार आहे.

श्रीरामपूर : कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कष्टकरी समाजातील १६ मुलांना एकत्र करून तयार झालेला ‘द मॅसेज आॅफ सॅल्व्हेशन’ हा लघु चित्रपट थेट इस्त्राईलमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘इस्त्राईलच्या अल्फा अ‍ॅन्ड ओमेगा’ या संस्थेने हा चित्रपट तेथे प्रदर्शित करण्याची जबाबदारी घेतली असून दिग्दर्शक, निर्माता अमितकुमार तोरणे यांचा दोन महिन्याचा खर्च करण्याचीही तयारी दर्शविली आहे. मात्र तेथपर्यंत पोहचण्यासाठी लागणारे पैसेही अमितकुमार यांच्याकडे नाहीत. ते उभे करण्यासाठी त्यांची धडपड आता सुरू आहे. अमितकुमार हा मूळचा पढेगाव (ता. श्रीरामपूर) येथील. वडील राहुरी न्यायालयात वकिलाकडे कारकुनी करतात, आई गृहिणी. शेती नसलेल्या तोरणे कुटुंबात तीन मुली व अमितकुमार हा एकुलता एक मुलगा. आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने मुलांनी शिक्षणात स्वत:ला झोकून दिले. तोरणे यांच्या तीनही मुलींनी शिक्षणात उज्ज्वल नाव कमविले. मुलगाही मागे नव्हता. मात्र धार्मिक वेड त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. उज्जैन येथे नोकरी करत असताना बायबलमधील एक प्रसंग त्याच्या मनाला भावला. त्यावर त्याने निबंध लिहिला. मात्र तो किती जणांना समजेल, अशी चिंता लागून असलेल्या अमितला मग लघुचित्रपट करण्याचे सूचले. त्यातून हा चित्रपट तयार झाला. ‘पश्यताप व पस्तावा यातील फरक व विश्वासाचे महत्त्व’ यावर आधारीत हा लघुपट नेवासा तालुक्यातील घोडेगाव, भानसहिवरा, राहुरी तालुक्यातील दरडगाव, ताहराबाद, श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव, लाडगाव, कान्हेगाव येथे चित्रीत करण्यात आला आहे. रात्रंदिवस कष्ट करत ९ दिवसांत हा लघुपट चित्रीत झाला. (प्रतिनिधी)