शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

प्रहार संघटना सर्व जागा लढविणार : आमदार बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 16:52 IST

महापालिकेत एक चहा दोनशे रुपयांना मिळतो. मंत्र्यांच्या हार-तुऱ्यासाठी एकाच दिवशी ९५ हजार रुपयांचा खर्च केला जातो.

अहमदनगर : महापालिकेत एक चहा दोनशे रुपयांना मिळतो. मंत्र्यांच्या हार-तुऱ्यासाठी एकाच दिवशी ९५ हजार रुपयांचा खर्च केला जातो. एका झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी ९५ हजार रुपयांचे बिल काढण्यात आले. घोटाळ््याची रक्कम ५० कोटीपर्यंत असल्याचा आरोप आ. बच्चू कडू आणि अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रहार संघटना महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.एका कार्यक्रमासाठी नगरमध्ये आलेल्या आ. कडू यांनी नगर महापालिकेतील भ्रष्टाचारावर घणाघात केला. अजय बारस्कर यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवली. ती पत्रकारांना सविस्तरपणे सांगितली. त्यानंतर महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आ. कडू म्हणाले, नगर महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. एका चहाच्या बिलांमध्ये गरिबांची घरे बांधून झाली असती. या चहासाठी मुख्यमंत्र्यांकडून दूध आणि मोदी यांच्याकडून चहा आणला असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा चहा महाग झाला असावा. याबाबत अधिवेशनात आवाज उठविणार आहे. अशा घोटाळ््यांमुळेच महापालिकेवर लोकांचा विश्वास राहिला नाही. प्रहार संघटना महापालिकेच्या सर्व जागा लढविणार आहे. चोरांनी लढविण्यापेक्षा आम्ही ही निवडणूक लढवू.आयटी विभागात महाघोटाळेदुष्काळाचे सावट असताना महावितरण कंपनी शेतकºयांची अडवणूक करीत आहे. शेतकºयांना डीपी बसवून दिली नाही तर उर्जामंत्री चंद्रशेखर बावकुळे यांचा प्रतिकात्मक पुतळा मंत्रालयावर उलटा टांगण्याचा इशाराही आ. कडू यांनी दिला. आयटीआयच्या परीक्षेत गरीब विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. आम्ही बोललो तर लगेच कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल होतो. अधिकारी कायदे पाळत नाहीत, त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल होत नाही. आम्ही महात्मा गांधी यांच्या मार्गानेच जातो. मात्र अधिकारी कायदा तुडविणार असतील तर भगतसिंग यांच्या मार्गानेच जावे लागेल. रस्त्यांमध्ये जेवढा घोटळा होतो, त्यापेक्षा कितीतरी मोठे घोटाळे सरकारच्या आयटी विभागात होतात, असाही आरोप आ. कडू यांनी केला. असे घोटाळे असतील तर गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते.घोटाळ््याचे नमुनेदीडशे जणांच्या चहाचे १५ हजार रुपये बिलस्वातंत्र्यदिनी मंत्र्यांच्या सत्कारासाठी९५ हजार रुपयांचे बुकेझेरॉक्ससाठी लाखो रुपयांचे बिलेप्रकल्प अहवालाच्या नावाखालीलाखो रुपये अदाएका झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी९० हजार रुपयेएका बाकड्याची किंमत ३२ हजार रुपयेएकाच ठेकेदाराकडे अनेक कामे

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBacchu Kaduबच्चू कडू