शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाडव्याला गृहप्रवेशाची ‘गुढी’ ; नगर जिल्ह्यात रिअल इस्टेटमध्ये चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 16:44 IST

हिंदू नववर्ष व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नगर जिल्ह्यात गृहखरेदीचा कल वाढला आहे. गेल्या दोन वर्षांच्या मंदीनंतर रिअल इस्टेटमध्ये हळूहळू चैतन्य येत असून, यंदा मध्यमवर्गीयांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : हिंदू नववर्ष व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नगर जिल्ह्यात गृहखरेदीचा कल वाढला आहे. गेल्या दोन वर्षांच्या मंदीनंतर रिअल इस्टेटमध्ये हळूहळू चैतन्य येत असून, यंदा मध्यमवर्गीयांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.स्वत:चे घर असावे, ही प्रत्येकाचे इच्छा असते. त्यातही शहरात घर खरेदीचा आनंद वेगळाच असतो. ती फक्त राहण्याची सोय नाही, तर एक मोठी आर्थिक गुंतवणूक ठरते. त्यामुळे इतर स्थावर संपत्तीपेक्षा गृहखरेदीकडे प्रत्येकाचा ओढा असतो. मागील दोन वर्षांत रिअल इस्टेटमध्ये मंदीचे वातावरण आले. नोटाबंदी, रेरा कायदा, जीएसटी आदी कारणांमुळे व्यवहार ठप्प झाले. बाजारात चलन फिरत नसल्याने सर्वच घटकांवर कमी-अधिक प्रमाणात परिणाम झाला. परंतु मागील वर्षी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे ही मंदी काहीशी धुतली गेली. गेल्या सहा महिन्यांत बाजार पूर्वपदावर येत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. त्यातही समाजातील सर्वच घटकांसाठी सध्या घर खरेदीला योग्य वातावरण आहे. घटलेला व्याजदर, सरकारी अनुदान, घरांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता अशा सर्वच बाजूंनी घर खरेदीचा मुहूर्त जुळून येत आहे. त्याचा पुरेपूर फायदा या गुढीपाडव्याला उचलला जातोय.हिंदू नववर्ष व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला ग्राहक मोठी खरेदी करतात. त्यात घरखरेदीला प्रथम प्राध्यान्य दिले जाते. या पाडव्याला अनेकजण आपल्या नवीन घरीच गुढी उभारण्याच्या तयारीत आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी अनेक आॅफर दिल्याने त्याचाही फायदा उठवला जात आहे. मागील काही दिवसांत गृहकर्जाचे व्याजदर घटले आहेत. शिवाय पंतप्रधान आवास योजनेत गृहकर्जाला अडीच लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाते. बाजारात सध्या पाहिजे तशी घरे ‘रेडिपझेशन’मध्ये आहेत. त्यामुळे कामाचा दर्जा, लोकेशन, फायनान्स कंपन्यांकडे गृहकर्जाचे पर्याय अशा अनेक गोष्टींसाठी ग्राहकांना वेळ देता येत आहे. या सर्व सकारात्मक वातावरणामुळे यंदाच्या गुढीपाडव्याला मागील वर्षीपेक्षा २० टक्क््यांनी गृहखेरदीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खात्रीनेच गुंतवणूक करा

चांगल्या मुहूर्ताचा गैरफायदा घेण्यासाठी किंवा ग्राहकांना मोठ्या संख्येने आकर्षित करण्यासाठी विकासक अनेक आॅफर देतात. परंतु ग्राहकांनी सर्व गोष्टी तपासून, खात्री करून, तज्ज्ञांचा, वकिलांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. केवळ बुकिंगची घाई न करता कागदपत्रांची खातरजमा करूनच घर खरेदी करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सध्या गृहखरेदीकडे सर्वसामान्यांचा कल आहे. १० ते २० लाखांपर्यंतची घरे पटापट विक्री होत आहेत. रो-हाऊसिंग, वन आर. के. ते वन बीएचकेला चांगली मागणी आहे. त्यातही पंतप्रधान आवास योजनेच्या सबसीडीचा फायदा होत असल्याने घरखेरदी वाढली असून, गेल्या दोन वर्षांतील मंदी पूर्वपदावर येत आहे. रिअल इस्टेटमध्ये गुढीपाडव्याला सर्वाधिक घर खरेदी नोंदवली जाते.- राजेंद्र पाचे, बांधकाम व्यावसायिक

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८