शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

प्रतिकूलतेवर मात करत तेशवानीची अभिनयात झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 15:11 IST

लहानपणापासून अभिनयाची आवड, घरची परिस्थिती बेताची, चित्रपटसृष्टीत कोणी ओळखीचे नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामीण भागातील तेशवानी वेताळ हिने अभिनयात चांगलीच झेप घेतली आहे.

नानासाहेब जठार  । 

विसापूर : लहानपणापासून अभिनयाची आवड, घरची परिस्थिती बेताची, चित्रपटसृष्टीत कोणी ओळखीचे नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामीण भागातील तेशवानी वेताळ हिने अभिनयात चांगलीच झेप घेतली आहे.

सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या तेशवानीचे मूळगाव पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद आहे. तिचे वडील रमेश वेताळ हे वाहन चालक आहेत. आई संगीता ही घर सांभाळते. रांजणगाव मशीद हे दुष्काळी गाव आहे. त्यामुळे तेशवानीच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची होती. 

गावात शेतीवाडी नसल्याने तिच्या वडिलांनी उपजीविकेसाठी कुटुंबासह पुण्यात जाण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला ते दुसºयाच्या ट्रकवर चालक होते. नंतर त्यांनी स्वत:ची ट्रक घेतली. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. अशा सर्वसामान्य कुटुंबात तेशवानीचा २००३ मध्ये जन्म झाला. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अगदी पहिलीत असतानाच तिने  शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन अभिनयाची   चुणूक दाखवत असे. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी    तिला आई, वडिलांनी प्रोत्साहन दिले. 

२०११ साली तिसरीत असताना चित्रपट निर्माते विश्वास राजणे यांनी तिला ‘झेंडा स्वाभिमान’ या चित्रपटात प्रमुख भूमिका करण्याची संधी दिली. या चित्रपटातून तिने अल्पवयातच यशस्वी पदार्पण केले. चित्रपटातून सिने अभिनेत्री साकारत असताना तिने शिक्षणात खंड पडू दिला नाही. मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ७९ टक्के गुणांनी ती उत्तीर्ण झाली होती. यावर्षी ती म्हाळसाकांत कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत आहे. तिने झेंडा स्वाभिमानाचा, पतंग, घुमा, आठवणी माहेरच्या या चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारली, तर मन-मनथाचा, धूम-धूमधडाका, पॉकेटमनी, न्यायाम, वा पैलवान,   बाजार, दाहवी, यलो, आयटमगिरी या चित्रपटातही सहायकाची भूमिका केली. 

तू माझा सांगाती, बे दुणे चार, बोधीवृक्ष या मालिकातही तिने अभिनयाचा ठसा उमटविला. सळो की पळो, युग प्रवर्तक छत्रपती शिवराय या नाटकातही तिने अभिनय केला आहे. संकल्प गोळे यांचे काळी मैना व माझ्या प्रेमाचा होकार देना, अजय-अतुल यांच्या वणवा पेटला, साजन-विशाल यांचे येडा येडा या गाण्यातही तिने नृत्य केले आहे. 

लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची आवड होती. या क्षेत्रात करिअर करावे यासाठी मला आई-वडिलांनी चांगली साथ दिली. चित्रपट दिग्दर्शक विश्वास राजणे यांनी सर्व प्रथम चित्रपटात संधी दिली. त्यामुळे या क्षेत्रात कमी वयात नाव कमावू शकले. या क्षेत्रात जे लोक माझ्या पाठीशी आहेत, त्यांची मी ऋणी आहे.-तेशवानी वेताळ, अभिनेत्री

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाartकला