शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गड्यांनो, आपला गावच बरा, कसली झंझटच नाय! गावागावात गप्पांचे फड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 06:18 IST

कोरोनाने जगाची झोप उडाली. शहरामधील ‘हवा टाईट’ झाली. शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह बंद झाले आहेत.

- बाळासाहेब काकडेश्रीगोंदा (जि. अहमदनगर) : मुंबई-पुण्यासारख्या शहरात कसला तरी कोरोना आजार आलाय म्हणत्यात. माणूस वाचत नाही, म्हणतात गड्यांनो. आपण लहानाचे मोठे झालो. ना कोरोना, ना स्वाईन फ्लू. त्यामुळे आपलं गावच बरं बुव्वा! कसली झंझटच नाय! ज्येष्ठ नागरिकांमध्ये अशा गप्पांचे फड गावागावातील पार आणि मारुती, गणपतीच्या मंदिरात रंगू लागले आहेत.कोरोनाने जगाची झोप उडाली. शहरामधील ‘हवा टाईट’ झाली. शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह बंद झाले आहेत. टीव्ही आणि सोशल मीडिया केवळ कोरोनाचीच कॅसेट वाजवत आहे, असे ग्रामस्थ एकमेकांना सांगत आहेत. सोमवारी कोरोनामुळे श्रीगोंद्याचा आठवडे बाजार बंद होता. त्यामुळे गजबजलेले शहर मात्र ओसाड पडल्यासारखे चित्र होते. बाजारतळावर जनावरही पाहावयास मिळाले नाही. श्रीगोंदा शहरापासून दहा किमी अंतरावरील आढळगावचा दुपारी फेरफटका मारल्यावर सगळीकडे शांतता होती. गणपती-मारुतीच्या मंदिरात सोपाना गव्हाणे, शंकर शिंदे, तात्या वडवकर, भाऊ डोके, शिवदास उबाळे, देवीदास गव्हाणे, के. डी. औटी ही ज्येष्ठ मंडळी गप्पा मारत होती. त्यांच्या चेहऱ्यावर कोरोनाचे कोणतेही टेन्शन दिसले नाही.शहरात रुग्ण आढळत आहेत. आपल्या गावात मात्र शुद्ध हवा, पाणी आणि भाजीपाला, फळे आहेत. चुलीवरची भाकरी, भाजी. सारं आबादीआबाद आहे. कधीमधी दुखायला लागलं, तर पन्नास रुपयात इंजेक्शन आणि शंभर रुपयांच्या गोळ्या घेतल्या की माणूस ठणठणीत होतो. खोकला आला तर सरकारी दवाखान्यातील पातळ लाल औषध मिळते, असे ग्रामस्थांनी सांगितले.के. डी. औटी म्हणाले, मोबाइल केला तर कोरोना आलाय. हात धुवायची कॅसेट लागते. टीव्हीवर तीच गत. त्यामुळे मी तर मोबाइल ठेवून दिला. टीव्हीही पाहत नाही. गावातील पोरं नोकरीधंद्याच्या निमित्ताने शहरात गेली आहेत. त्यांनीही माघारी यावे. शेतीत काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. येथे परप्रांतीय पोट भरतात आणि आपली पोरं शहरात पोटं भरत्यात. ते गावात आले, तर शेती तरी चांगली होईल, अशी भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.गावाकडची माणसं बिनधास्त..कोरोनाचे काही रूग्ण शहरात आढळून आले आहेत. मात्र गावाकडे कोरोनाबाबत केवळ चर्चाच आहे. याबाबत गावाकडची माणसं बिनधास्त दिसतात. ग्रामीण भागात कोरोनाची लक्षणे असलेला एकही रूग्ण दिसत नाही.- डॉ. कमुदिनी शिंदे,आढळगाव, ता. श्रीगोंदा 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAhmednagarअहमदनगर