श्रीगोंदा/कोपरगाव: या उन्हाळी सुट्टीमध्ये लोकमत बाल विकास मंचच्यावतीने कोपरगाव व श्रीगोंदा येथे ‘समर वर्कशॉप २०१६’ या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.फक्त बालविकास मंच सदस्यांसाठी मोफत असलेल्या या ३ दिवसीय शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना बासरीवादन, रांगोळी, आर्ट अॅण्ड क्राफ्टमध्ये टाकाऊ वस्तुंपासून टिकाऊ वस्तू बनविणे, याविषयी कार्यशाळा, याशिवाय विद्यार्थी अभिव्यक्ती, परदेशी वाद्यांचे सादरीकरण व विविध मनोरंजक खेळांची मजा लुटता येणार आहे. नगर येथील गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व राष्ट्रपती पदक विजेते डॉ. अमोल बागुल विद्यार्थ्यांना शिबिरामध्ये मार्गदर्शन करतील.या शिबिरास येताना विद्यार्थ्यांनी २ वर्तमानपत्रे, २ रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, कात्री, कटर, सुतळी, डिंक, वही, पेन इत्यादी साहित्य सोबत आणावयाचे आहे. या शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता ९७६७१२८००६ व ९८५०३०२८०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.कार्यक्रमाचे वेळापत्रककोपरगाव- दि. ९ ते ११ मे २०१६, वेळ- स. ९ ते १२स्थळ : एस. जी. इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगावश्रीगोंदा - दि. १३ ते १६ मे २०१६, वेळ- स. ९ ते १२स्थळ : शारदा विद्या निकेतन, श्रीगोंदा
कोपरगाव, श्रीगोंदा येथे ‘समर वर्कशॉप २०१६’ चे आयोजन
By admin | Updated: May 6, 2016 23:27 IST