शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात विशेष ग्रामसभांचे आयोजन; जि. प.च्या ग्रामपंचायतींना सूचना 

By चंद्रकांत शेळके | Updated: July 11, 2023 20:04 IST

सध्या जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात सुरू असलेली जलजीवन मिशनची कामे, हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) मानांकन प्राप्त गावांमध्ये शौचालयांचे बांधकाम, तसेच इतर शासकीय योजनांच्या अनुषंगाने ग्रामसभेमध्ये चर्चा घडवून आणून ग्रामसभेचे ठराव घेण्यासाठी १० ते १३ जुलै २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या आहेत.

सध्या जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी देण्याचा केंद्र व राज्य शासनाचा मानस आहे. जलजीवन मिशन अंतर्गत अनेक गावात पाणी योजनेची कामे सुरू आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडील २४ सप्टेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार जलजीवनच्या कामांबाबत विशेष ग्रामसभा घेऊन चर्चा घडवून आणणे, प्रत्यक्षात होणाऱ्या कामांमध्ये काही त्रुटी राहू नयेत, ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन व्हावे व ग्रामस्थांची मते जाणून घेऊन ग्रामस्थांमध्ये योजनेविषयी स्वामित्वाची भावना तयार करणे, शंभर टक्के नळजोडणी झालेली गावे ‘हर घर जल’ घोषित करण्याबाबत ग्रामसभांचे ठराव घेण्यात येणार आहेत.

त्याचप्रमाणे, ग्रामीण भागातील हागणदारी मुक्ततेचे मानांकन प्राप्त गावांमध्ये शौचालयांचे बांधकाम, पुनस्थापिकरण, सामुदायिक शौचालय संकुल, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन व इतर अनुषंगिक कामे पूर्ण झालेल्या गावांमध्ये हागणदारी मुक्त गाव अधिक (ओडीएफ प्लस) गाव चित्रीकरण करून ग्रामसभेच्या ठरावाद्वारे घोषित करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त ऐनवेळच्या विषयांचा या ग्रामसभेमध्ये समावेश असणार आहे. याकरिता जास्तीत जास्त ग्रामस्थांनी ग्रामसभेला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे यांनी केले आहे. शासकीय योजनांसाठी जागा देण्यावर चर्चामुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, डिजिटल इंडिया अंतर्गत मोबाईल टाॅवर, जलजीवन योजनेंतर्गत टाकी बांधणे, दहनभूमी, दफनभूमी आदींच्या कामासाठी गावात योग्य शासकीय जागा आवश्यक असते. त्यामुळे गावातील कोणती जागा या योजनांसाठी द्यायची किंवा शासकीय जागा उपलब्ध नसेल तर योजना मागे जाऊ नये म्हणून पर्याय काय? यावरही ग्रामस्थांची चर्चा होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरgram panchayatग्राम पंचायत