संगमनेर येथील सांदण आदिवासी लोकचळवळची कार्यक्रमात आ. डॉ. लहामटे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, मधुकर तळपाडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे, माजी पंचायत समिती उपसभापती मारुती मेंगाळ, सचिव किरण बांडे उपस्थित होते.
लहामटे म्हणाले, तरुणांनी आपली क्रयशक्ती आपल्या गावासाठी आणि समाजासाठी खर्च करावी. चुकीच्या मार्गाला न जाता आपला काही वेळ गावासाठी द्यावा आणि गाव विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करावा या माध्यमातून गावाचा विकास साधता येईल. अशोक भांगरे म्हणाले, प्रत्येक गावातील सुशिक्षित लोकांनी, तरुणांनी महिन्यातील एक दिवस आपल्या गावासाठी, समाजासाठी द्यावा व आपल्या अडचणी आम्हाला सांगा त्या सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करू.
मधुकर तळपाडे, मारुती मेंगाळ यांनीही सांदण चळवळीच्या कार्याचे व उपक्रमाचे आपल्या मनोगतातून कौतुक केले. पुष्पा कोरडे यांनी सूत्रसंचालन केले, तर भाऊराव धोंगडे यांनी आभार मानले.