शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल करण्याचा आदेश

By मिलिंदकुमार साळवे | Updated: September 20, 2017 14:06 IST

अहमदनगर : गणोरे (ता. अकोले) येथील येथील सावळेराम दातीर पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी संचालक मंडळाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसावळेराम दातीर पतसंस्था विशेष चौकशी अहवाल सादरपतसंस्थेचा स्वाहाकारसव्वा पाच कोटींचा अपहार

अहमदनगर : गणोरे (ता. अकोले) येथील येथील सावळेराम दातीर पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी संचालक मंडळाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.‘लोकमत’ने सर्वप्रथम या पतसंस्थेतील अपहार उघडकीस आणला. याबाबत १० सप्टेंबरला ‘दातीर पतसंस्थेत सव्वा पाच कोटींचा अपहार’ या मथळ्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पतसंस्थेतील अपहाराबाबत वृत्तमालिका प्रकाशित करण्यात आली. याची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी अकोले येथील सहायक निबंधक कांतीलाल गायकवाड यांना चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. चार्टर्ड अकाऊंटंट सुविद्या सोमाणी यांनी सन २०१६-१७ चे लेखापरीक्षण केले. त्यातून संस्थेतील अपहारावर शिक्कामोर्तब झाले. ‘लोकमत’ने पतसंस्थेतील घोटाळे उघडकीस आणल्यानंतर सहायक निबंधक गायकवाड यांनी लेखापरीक्षक सोमाणी यांच्याकडून अपहाराबाबत विशेष अहवाल मागविला होता. त्यानुसार सहायक निबंधक कार्यालयास हा विशेष अहवाल सादर झाला आहे. त्यानुसार गायकवाड यांनी सहकार खात्यातील नेहमीची दप्तर दिरंगाई न करता तात्काळ सोमाणी यांना या अपहाराबाबत संस्थेच्या संचालक मंडळाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.आर्थिक तपासणीत पतसंस्थेतील सावळागोंधळा उघडकीस आला. त्यानुसार पतसंस्थेने खोटे जमाखर्च करून संस्थेची दिशाभूल करून या रकमेचा अपहार केला आहे. जिल्हा बँकेव्यतिरिक्त इतर बँक खाती रक्कमेची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. या गुंतवणुकीस सहकार खात्याच्या सहायक निबंधकांची परवानगी घेतली नाही. संस्थेने बँक नॉन रिफंडेबल खाती रकमेची गुंतवणूक केलेली आहे. संस्थेने इतर गुंतवणूक केली आहे. गुंतवणूक नोंदवही ठेवली नाही. संस्थेने लेखापरीक्षणासाठी कोणत्याही याद्या पुरविल्या नाहीत.  डेडस्टॉक रजिस्टर ठेवले नाही, अशा अनेक बाबी समोर आल्या.