शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांची बदली रद्द करण्यासाठी नेवासा शहरात रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 17:23 IST

तहसीलदार उमेश पाटील यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी पंचायत समिती समोर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

नेवासा : तहसीलदार उमेश पाटील यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी पंचायत समिती समोर तालुक्यातील नागरिकांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजता पंचायत समिती समोर नेवासा - श्रीरामपूर रस्त्यावर रास्तारोको अर्धा तास सुरू होता.निवेदनात म्हटले आहे, कार्यकाळ पूर्ण झालेला नसतानाही तहसीलदार पाटील यांची बदली का करण्यात आली, याची कारणे जनतेसमोर स्पष्ट करावे. तहसीलदार पाटील हे नेवासा येथे कार्यरत असल्यापासून त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. त्याचे भीमा कोरेगाव प्रकरण, मराठा मोर्चे, इतर समाजाचे ही मोर्चे निघाले. या संदर्भात महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटले. तालुका अतिसंवेदनशील असतानाही केवळ तहसीलदार पाटील यांनी योग्यप्रकारे हाताळून तालुक्यात कुठलीही अनुचित घटना होऊ दिली नाही. स्वत: च्या जीवावर उदार होऊन तालुक्यात चालू असलेल्या बेकायदेशीर वाळू माफियांच्या मुसक्या आवळून शासनाला नेवासा तालुक्यातून सर्वात जास्त महसूल मिळवून दिला. कार्यालयातील कर्मचा-यांना ही शिस्त लावली. कर्तव्यदक्ष अधिका-याची तडकाफडकी बदली करण्यात आल्यामुळे ही बदली त्वरित रद्द करावी. या मागणीसाठी तालुक्यातील नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले.यावेळी आंदोलनाचे प्रमुख संजय सुखधान, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, महेश मापारी, डॉ.करणं घुले, मनोज पारखे, बाळासाहेब कोकणे, भाऊसाहेब वाघ, गफूर बागवान, बाळासाहेब पवार, जावेद इनामदार, जाकीर शेख यांची भाषणे झाली. नायब तहसीलदार नारायण कोरडे व सहायक पोलिस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा