शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मी कोणत्या पक्षाकडून लढणार याचीच विरोधकांना चिंता : शंकरराव गडाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 11:49 IST

मी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून लढविणार या चिंतेने विरोधकांना ग्रासले आहे.

नेवासा : पाटपाण्याचे नियोजन झाल्यासच तालुक्याला भवितव्य आहे. मी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून लढविणार या चिंतेने विरोधकांना ग्रासले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केले.सोनई-करजगाव योजनेत समावेश नसताना पिण्याच्या पाण्यासाठी आक्रोश करणाऱ्या उस्थळ दुमाला, नारायणवाडी, धनगरवाडीच्या ग्रामस्थांनी स्वखर्चाने या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल माजी आमदार गडाख यांचा उस्थळ दुमाला येथे नागरी सत्कार करण्यात आला.राजकीय पक्षापेक्षा लोकांची कामे मार्गी लावण्याला आपले प्राधान्य आहे. विकास कामे करताना भेदभाव करणे आपल्या रक्तातच नाही. लोकहिताच्या मुद्यावर पक्षीयबंधन आड येऊ देत नसल्याने कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची हा मुद्दा गौण ठरतो, असे स्पष्ट करून गडाख म्हणाले, हातात हात देण्याचे नाटक आपल्याला जमले नाही, मात्र लोकांना जे पाहिजे ते मिळवून देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. जायकवाडी बॅकवॉटरच्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा चार तासांवर आणल्याबाबत लोकप्रतिनिधी बोलत नसल्याबद्दल गडाख यांनी आश्चर्य व्यक्त केले. पूर्ण क्षमतेने भरलेल्या जायकवाडी धरणातून दहा हजार क्युसेकने पाणी मराठवाड्याला सोडण्यास सुरूवात झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. रस्ते, वीज रोहित्र बसविण्याची जबाबदारी शासन पार पाडत असताना आमदारकीच्या माध्यमातून वेगळे काय केले ते आमदार मुरकुटे यांनी सांगावे, असे आवाहन गडाख यांनी केले.मी राजकारण, समाजकारण करत असताना कधीही नाटक केले नाही. तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम केले. धरणात पाणी कमी असतानाही तालुक्याला तुमच्या सहकार्याने पाणी मिळवून दिले. विधानसभेत अपयश आले तरी पाण्यासाठी लढलो हे तुम्ही सर्वांनी पाहिले. यापुढेही तालुक्याच्या पाण्यासाठी कुठल्याही पक्षासमोर झुकणार नाही, असे माजी आमदार शंकरराव गडाख म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाnevasa-acनेवासा