शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

दर सोमवारी नागरिकांना सरकारी कागदपत्रे खुली करा : प्रहार संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 18:56 IST

शासन निर्णयाप्रमाणे दर सोमवारी सर्व सरकारी कार्यालयातील कागदपत्रे व अभिलेख नागरिकांना पाहण्यासाठी मोफत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

अहमदनगर : शासन निर्णयाप्रमाणे दर सोमवारी सर्व सरकारी कार्यालयातील कागदपत्रे व अभिलेख नागरिकांना पाहण्यासाठी मोफत उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.यासंदर्भात संघटनेचे अजय महाराज बारस्कर, विनोद परदेशी, अजित धस, दत्तात्रय दरेकर, मेजर लियाकत खान, प्रकाश राठोड, किशोर राठोड, सागर जाधव आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, माहितीचा अधिकार कायद्यामध्ये भारताच्या संरक्षण खात्याच्या व इतर काही महत्त्वाचे अपवाद सोडल्यास सर्व कागदपत्रे नागरिकांना उपलब्ध करून देणे तसेच नागरिकांनी स्वत: कार्यालयात जाऊन त्या कागदपत्रांचे अवलोकन करण्याची तरतूद करण्यात आली. परंतु भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचारी हे पारदर्शकता नको म्हणून सातत्याने नागरिकांना माहिती देण्यास टाळाटाळ करतात. थेट राज्य माहिती आयोगाकडे नागरिकांना दाद मागावी लागते. म्हणून महाराष्ट्र शासनाने माहिती अधिकार कायद्यामध्ये सुधारणा करून दर सोमवारी तीन ते पाच या वेळेत जिल्हास्तरापासून तर ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयापर्यंतच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरिकांना प्राधान्याने आवश्यक असलेल्या कागदपत्रे, तसेच अभिलेख उपलब्ध करून देण्याची तरतूद केली. हा निर्णय घेऊन महिना उलटला तरी अद्याप संबंधित कार्यालयांनी या आदेशाची अंमलबजावणी सुरू केलेली नाही.त्यामुळे सर्व सरकारी कार्यालयांना आदेश देऊन अशी कागदपत्रे उपलब्ध करण्यास सूचित करावे, माहिती अधिकार कलम सतरा नुसार प्रसिद्ध केलेली माहिती ही कार्यालयाच्या दर्शनी भागात नोटीस बोर्डवर लावणे बंधनकारक करावे, जिल्हा माहिती कार्यालयाकडून या कायद्याबाबत जनजागृती करावी, जे लोकसेवक कर्मचारी नागरिकांना माहिती दाखवणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे..

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर