अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी २७८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार ९८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण वाढले असून ते आता ९७.१० टक्के इतके झाले आहे. सोमवारी जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत २३५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार २३५ इतकी झाली आहे. नगर शहरातील रुग्ण कमी होऊन फक्त तीनच पॉझिटिव्ह आढळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७० आणि अँटिजेन चाचणीत १६० रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये कोपरगाव १, नगर ग्रामीण १, पारनेर १ आणि पाथर्डी २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ३, अकोले ३, जामखेड २, कर्जत १, कोपरगाव २, नगर ग्रामीण ३, नेवासा ४, पारनेर ८, पाथर्डी २, राहुरी ३, संगमनेर १६, शेवगाव ३, श्रीगोंदा १३ आणि श्रीरामपूर ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत १६० जण बाधित आढळून आले. अकोले २१, जामखेड १७, कर्जत ५, कोपरगाव ५, नगर ग्रामीण ३, नेवासा ७, पारनेर २६, पाथर्डी १०, राहाता १०, राहुरी १४, संगमनेर ७, शेवगाव ८, श्रीगोंदा १७ आणि श्रीरामपूर १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
--------
बरे झालेली रुग्ण संख्या : २,७०,९८२
उपचार सुरू असलेले रुग्ण : २२३५
मृत्यू नोंद : ५,८७२
एकूण रुग्ण संख्या : २,७९,०८९