शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

शिर्डीतून सेनेच्या वाकचौरे यांनाच उमेदवारी; विनायक राऊतांनी महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमोर दिले संकेत

By शिवाजी पवार | Updated: March 15, 2024 14:21 IST

महाआघाडीच्या उमेदवारी वाटपात शिर्डीच्या जागेबाबत अनेक दिवस घोळसुरू होता. शिर्डीची जागा काँग्रेसला सोडून त्या बदल्यात शहरी मतदारसंघ सेनेला देण्याची चर्चा सुरू होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे स्पष्ट केले. वाकचौरे हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील व विजयी होतील असे ते म्हणाले.

शिर्डीतील उमेदवारीचा सस्पेन्स त्यामुळे उठला आहे. वाकचौरे यांच्या उमेदवारीची मुंबईतून केवळ औपचारिक घोषणा त्यामुळे होणे बाकी आहे. शिर्डीत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुरुवारी विनायक राऊत यांनी ही माहिती दिली. यावेळी भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे सचिन बडदे, लखन भगत, संजय छल्लारे, राष्ट्रवादीचे संदीप वर्पे उपस्थित होते.

   महाआघाडीच्या उमेदवारी वाटपात शिर्डीच्या जागेबाबत अनेक दिवस घोळसुरू होता. शिर्डीची जागा काँग्रेसला सोडून त्या बदल्यात शहरी मतदारसंघ सेनेला देण्याची चर्चा सुरू होती. मात्र खासदार राऊत यांनी ही चर्चा थांबवली आहे. ते शिवसेनेचे सचिव असून वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमोर वाकचौरे यांची उमेदवारी जाहीर केल्याने इतर सर्व चर्चा आता संपुष्टात आल्या आहेत.

राऊत म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना लोक विजय करतील. वाकचौरे हे लोकसंपर्क असणारे उमेदवार आहेत. त्यांनी श्रद्धा व सबुरी जपली आहे. फोडाफोडीचे राजकारण लोकांना नको आहे. शिवसेनेत पंतप्रधानपदासाठी कोणीही दावेदार नाही. महाआघाडीचे नेते व राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे इंडिया आघाडीकडून दावेदार आहेत. इंडिया आघाडीची सत्ता आल्यास सेनेला मंत्रिपद मिळतील. त्याचा आम्हाला निश्चित अभिमान राहील.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी