शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन बदलीप्रकरण : २३४ गुरुजींचे पितळ उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 14:21 IST

आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करत सोयीच्या शाळेत बदली मिळविलेल्या २३४ गुरुजींच्या बदल्या शिक्षण विभागाने अपात्र ठरविल्या आहेत. अपात्र शिक्षकांना सुनावणीसाठी हजर राहा, असा आदेश जिल्हा परिषदेने बुधवारी सायंकाळी काढला आहे.

अहमदनगर : आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करत सोयीच्या शाळेत बदली मिळविलेल्या २३४ गुरुजींच्या बदल्या शिक्षण विभागाने अपात्र ठरविल्या आहेत. अपात्र शिक्षकांना सुनावणीसाठी हजर राहा, असा आदेश जिल्हा परिषदेने बुधवारी सायंकाळी काढला आहे. शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. संवर्ग १ व २ मध्ये बदली झालेल्या किंवा बदली नाकारणाऱ्या शिक्षकांच्या कागदपत्रांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरू केलेली तपासणी बुधवारी सायंकाळी पूर्ण झाली. फेरतपासणीचा अहवाल शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांना सादर केला आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या फेरतपासणीत संवर्ग १ मधील अपंगाचे आॅनलाईन प्रमाणपत्र नसणे, सन २०११ पूर्वीचे प्रमाणपत्र सादर करणे, मेंदूविकार, पॅरेलिसिस, कॅन्सर, हृदय शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्रांची खात्री न झाल्याने १५० शिक्षकांच्या झालेल्या बदल्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत़ तसेच संवर्ग २ मध्ये पती-पत्नी सेवेचा दाखला नसणे, वैयक्तिक मान्यता नसणे, पती-पत्नींच्या शाळांत अंतर ३० कि़मी़ पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्याने ७८ शिक्षकांच्या बदल्या बाद ठरविण्यात आल्या आहेत. शासनाने आॅनलाईन बदली प्रक्रियेतील संवर्ग १ व २ मधील शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करून दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यासाठी अंतिम मुदत १० जुलैपर्यंत आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दोन्ही संवर्गातील बदली झालेल्या किंवा बदली नाकारणा-या १ हजार ५६१ शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी केली. शिक्षकांनी आॅनलाईन सादर केलेल्या प्रमाणपत्रांची छाननी करण्यात आली. छाननीत त्रुटी आढळून आलेल्या शिक्षकांना नव्याने पुरावे सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.शिक्षकांनी नव्याने पुरावे सादर केले. नव्याने सादर केलेले पुरावे व आॅनलाईन सादर केलेले प्रमाणपत्रे, याची तुलना करण्यात आली. बदलीस अपात्र ठरविलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची खात्री झाली नाही. त्यामुळे त्यांच्या बदल्या अपात्र ठरविण्यात आल्या असून, शिक्षकांना त्यांचे म्हणणे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.मुख्यकार्यकारी अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून शुक्रवारपासून सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीत शिक्षकांनी समाधानकारक माहिती न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद