अहमदनगर : मागील शैक्षणिक वर्ष व सध्याचे चालू वर्ष अशा दोन्ही वर्षी शाळा कोरोनामुळे बंद आहेत. मात्र ॲानलाइन शिक्षण सुरू असून, शिक्षक तसा अभ्यासक्रम पाठवत आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्याने शाळांनी फी कमी करावी, असे पालकांचे म्हणणे आहे, तर मागील दोन वर्षांपासून फी वाढवली नाही, आहे तीच ठेवली, असे शिक्षणसंस्थांचे म्हणणे आहे. शिक्षण विभागाने मात्र फीबाबत काहीही सूचना दिलेल्या नाहीत.
मागील वर्षी मार्चपासूनच कोरोनामुळे शाळा बंद होत्या. मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेसह सर्वच खासगी शाळांनी ॲानलाइन अभ्यासक्रम देण्याची व्यवस्था केली. अभ्यासक्रम ॲानलाइन असला तरी शिक्षकांचे पगार, इंटरनेट किंवा इतर खर्च शाळांना येतो. कोरोनाची स्थिती लक्षात घेता खासगी शाळांनी दरवर्षी काही प्रमाणात वाढणारी फी यंदा वाढवली नाही. आहे तीच ठेवली. तर काही शाळांनी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कोविडमुळे मृत्यू झाला अशा पाल्यांना फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद व महापालिकांच्या शाळांना मात्र कोणतेही शुल्क नाही.
----------------
जिल्हा परिषद शाळा
माध्यमिक व उच्च मा. शाळा -
----------
ॲानलाइन शाळांमुळे वाचतो खर्च
ॲानलाइन शाळा सुरू असल्याने यात शाळांचा काॅम्प्युटर खर्च, वीज, पाणी, साफसफाई, सुरक्षाव्यवस्था आदींवर होणारा खर्च वाचतो. त्यामुळे शाळांनी फीमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.
-----------
१०० टक्के फी कशासाठी?
कोरोनामुळे अनेक पालकांचे आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे खर्चाचा विचार करता शाळांंनी कोविड काळात तरी फी कमी करावी. तसेच फी भरण्यासाठी चार ते पाच टप्पे पाडून द्यावेत.
- सुरज येरकळ, पालक
--------
ॲानलाइन शाळा सुरू असताना शाळांचा अनेक बाबींमध्ये खर्च वाचतो. त्यामुळे त्यांनी स्वत:हून शुल्क कमी करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्याचाही शाळांनी विचार करावा.
- प्रमोद टाकसाळ, पालक
------------
दरवर्षी संस्था शाळेच्या शुल्कात १० टक्के वाढ करते. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शुल्कात कोणतीही वाढ केलेली नाही. उलट जे पालक फी एकरकमी भरतील त्यांना दीड हजार रुपयांची सवलत मिळेल. शिवाय कोरोनामुळे ज्या पालकांचा मृत्यू झाला त्यांच्या पाल्याची फी कमी करण्याबाबत विचार सुरू आहे.
- दामोदर बठेजा, सचिव, सिंधी एज्युकेशन सोसायटी
---------
२०डमी १,२,३,४,