शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

 मालमत्ता खरेदी-विक्रीचे आॅनलाईन नोंदणी व्यवहार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 11:38 IST

कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चाळीस दिवसांपासून बंद असलेली जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये उद्यापासून (दि.६)उघडणार आहेत. त्यामुळे स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत होणार आहेत.

अहमदनगर : कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चाळीस दिवसांपासून बंद असलेली जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये ६ मे पासून उघडणार आहेत. त्यामुळे स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत होणार आहेत.मुद्रांक शुल्क विषयक नोंदणी आॅनलाईन प्रणालीद्वारे पूर्ववत सुरु करण्याबाबतचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय हे कलम १४४ चे पालन करुन ६ मे पासून सुरू होत आहेत, अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली.शासनाने याबाबत काही अटी-शर्ती घालून दिलेल्या आहेत. कंटेन्मेंट झोन घोषित केलेल्या क्षेत्राचा प्रतिबंधित कालावधी पूर्ण झाल्यानंतर तेथे दस्तांची नोंदणी सुरु करावी. कार्यालये सुरु करण्याच्या दिवशी व नंतर किमान प्रत्येक ७ दिवसांनी निर्जंतूक करुन घ्यावीत. नागरिकांना दस्त नोंदणीसाठी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ईस्टेपद्वारे व इतर ठिकाणी ईस्टेप इन किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य राहील. दस्त छाननी सादरीकरण झाल्यावरच इतर पक्षकारांना कबुली जबाब देण्यासाठी नावाच्या क्रमवारीनुसार प्रवेश द्यावा. एकावेळी जास्तीत जास्त चारच पक्षकारांना आत प्रवेश द्यावा. बायोमेट्रिक उपकरणाचा वापर करण्यापूर्वी व नंतर ते निर्जंतुक करावे. कर्मचाºयांनीही मास्क, ग्लोव्हज घालावे व सर्वांना सॅनिटायझर उपलब्ध करावे.बायोमेट्रीक डिव्हाईस, दरवाजाचे हॅन्डल्स, नोब्स, टेबल, खुर्ची आदींचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे. कार्यालयात टेबलांमधील अंतर किमान २ मीटर ठेवावे. नागरिकांना तोंडावर मास्क, स्वच्छ रुमाल बांधण्याबाबत सक्ती करावी, तसेच रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये पुरेसे अंतर राहील यादृष्टिने खुणा कराव्यात. आवश्यकता असल्यास पोलिसांची मदत घ्यावी. दस्त नोंदणी कार्यालयात ३३ टक्के कर्मचाºयांनी उपस्थित रहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बँक व बँकेतर वित्तीय संस्थांच्या वित्तपुरवठा कामकाजाकरिता मुद्रांक विकेत्यांकडून मुद्रांक पेपर फ्रँकिंग, बँकाकडून ईएसबीटीआर घेणे शक्य झालेले नाही. निष्पादीत करण्यात आलेल्या दस्तांचे मुद्रांक शुल्क विहित मुदतीमध्ये भरणे शक्य झाले नाही. अशा दस्तांचा भरणा ६ मे रोजी करता येईल, असेही मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTaxकरGovernmentसरकार