शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन बदलीप्रकरण : दीड हजार गुरुजींचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:33 IST

जिल्हा परिषदेच्या संवर्ग १ व २ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची फेरतपासणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, बदलीस अपात्र शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेकडून लवकरच जाहीर होणार आहे़

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या संवर्ग १ व २ मध्ये बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची फेरतपासणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, बदलीस अपात्र शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेकडून लवकरच जाहीर होणार आहे़ त्यामुळे दोन्ही संवर्गांचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील दीड हजार गुरुजींचा जीव टांगणीला लागला आहे़आॅनलाइन बदलीप्रक्रियेत संवर्ग १ व २ मधील अपात्र शिक्षकांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहेत़ जिल्हा परिषदेकडून संवर्ग १ व २ मध्ये बदली झालेल्या किंवा नाकारलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मोहीम उघडली आहे़ जिल्ह्यातील संवर्ग १ मध्ये बदली करून घेतलेले व बदली नाकारलेल्या शिक्षकांची संख्या ९३८ इतकी आहे़ संवर्ग दोनमध्ये ६२३ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत़ संवर्ग एक व दोन मध्ये बदली झालेल्या शिक्षकांनी बदलीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची फेरतपासणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सुरू आहे़ कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी १४ कर्मचाºयांची समिती स्थापन करण्यात आली असून, दहा तालुक्यांची तपासणी पूर्ण झाली आहे़ उर्वरित चार तालुक्यांतील शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर अपात्र शिक्षकांची यादी शिक्षण विभागाकडून जाहीर करणार आहे़ बदली अपात्र शिक्षकांना खो दिल्यामुळे ज्यांची बदली झाली आहे, त्यांच्या जागी अपात्र शिक्षकांची नियुक्ती करणार आहे़ त्यामुळे विस्थापितांना त्यांच्या मूळ शाळेवर जाण्याची संधी मिळणार आहे़ त्यामुळे सोयीच्या ठिकाणी बदली मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे दाखल करणे गुरुजींना चांगलेच महागात पडणार आहे़चारवेळा तपासणी करून पाटी कोरीचसंवर्ग १ व २ मध्ये बदली झालेल्या किंवा बदली नाकारणाºया शिक्षकांच्या कागदपत्रांची जिल्हास्तर, तालुका आणि पुन्हा जिल्हास्तरावर, अशी चारवेळा तपासणी करून झाली़ आता फेरतपासणीसाठी स्वतंत्र कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, या समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याने शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत़काय आहे संवर्ग-१ व संवर्ग २बदलीत संवर्ग १ व २ मध्ये समावेश असलेल्यांना प्राधान्य असते़ संवर्ग-१ मध्ये अपंग, गंभीर आजार आदींचा समावेश असून, संवर्ग-२ मध्ये पती-पत्नी एकत्रिकरणाचा समावेश आहे़संवर्ग १- बदली झालेलेउपाध्यापक- ४६९, पदवीधर-३५, मुख्याध्यापक-५५,बदली नाकारलेलेउपाध्यापक-२२८, पदवीधर-३८, मुख्याध्यापक-११३संवर्ग २ -उपाध्यापक-५१०, पदवीधर-४३, मुख्याध्यापक-११

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद