शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने रडविला शेतकरी : बारा गोण्यांचे मिळाले अवघे पन्नास रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 16:53 IST

संगमेनरच्या बाजार समितीत १२ गोणी कांदा (६५३ किलो) विक्रीस आणलेल्या एका शेतकऱ्याला वाहतूक, गोणी, तोलाई, हमाली, वाराई असा सर्व खर्च वजा करता अवघे ५० रूपये मिळाले.

घारगाव : संगमेनरच्या बाजार समितीत १२ गोणी कांदा (६५३ किलो) विक्रीस आणलेल्या एका शेतकऱ्याला वाहतूक, गोणी, तोलाई, हमाली, वाराई असा सर्व खर्च वजा करता अवघे ५० रूपये मिळाले. ऐन दुष्काळात मोठ्या कष्टातून पिकवलेल्या कांद्याला असा कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.संगमनेरच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील चंद्रकांत लाडुजी घुले नियमित कांदा उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. त्यांनी १२ गोण्या कांदा संगमनेर बाजार समितीत विक्रीस आणल्या होत्या. त्यांना ६५३ किलो कांदा विक्रीतून वाहतूक, गोणी, तोलाई, हमाली, वाराई असा सर्व खर्च वजा होता अवघे ५० रुपये मिळाले. यंदा आधीच दुष्काळाचे सावट आहे. कांदाच भविष्यात थोडाफार आर्थिक आधार देईल, अशी अपेक्षा ठेऊन सावरगाव घुले, नांदूर खंदरमाळ, सारोळे पठार, पोखरी बाळेश्वर आदी गावातील शेतकरी हे पीक घेतात. मात्र पाऊस न झाल्याने या भागातील कांदा पाण्याअभावी काही ठिकाणी जळून गेला आहे. त्यातत आहे, त्या कांद्यालाही अपेक्षित भाव मिळत नाही.असे झाले पैसे वजा..संगमनेर बाजार समितीतील आडतदाराकडे २० नोव्हेंबर रोजी कांदा विक्रीसाठी पाठविला होता. त्याचे दोन वेगवेगळे वक्कल होते. त्याचे एकूण वजन ६५३ किलो इतके भरले. त्यापैकी २२१ किलो कांद्याला प्रति किलोस २ रुपया इतका दर मिळाला. तर त्यापैकी ४३२ किलो कांद्याला प्रति किलोस १ रुपया ११ पैसे इतका दर मिळाला. एकूण रक्कम ९२१ रुपये ५० पैसे इतकी झाली. त्यातून हमाली ३४ रुपये ४० पैसे, तोलाई २५ रुपये, वाराई १२ रुपये तर मोटार भाडे ८०० रुपये एवढा बाजार खर्च पट्टीतून वजा करून शेतकºयाच्या हाती फक्त ५० रुपये १० पैसे उरले.मोठ्या आशेने १२ गोण्या कांदा बाजार समितीत आणल्या. १ नंबर कांद्याला २०० रूपये प्रतिक्विंटल, २ नंबरला १०० रूपये दर मिळाला़. कांदा लागवड, कापणी, खुरपणी, औषध फवारणी आदी खर्च हजारो रूपयांत जातो़ कांद्याला भाव मिळतो, फक्त शेकडो रूपयात़ - चंद्रकांत घुले, शेतकरी, सावरगाव घुले

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर