शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कांद्याचे भाव कोसळले; राहाता येथे शेतक-यांनी अडविला नगर-मनमाड महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 18:29 IST

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याचे भाव ढासळल्यामुळे संतप्त शेतक-यांनी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर बाजार समिती संचालक व व्यापा-यांनी यावर तोडगा काढत ६०० रुपयांवरुन कांद्याचे भाव १२०० रुपयांपर्यंत वाढविले.

राहाता : राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याचे भाव ढासळल्यामुळे संतप्त शेतक-यांनी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर बाजार समिती संचालक व व्यापा-यांनी यावर तोडगा काढत ६०० रुपयांवरुन कांद्याचे भाव १२०० रुपयांपर्यंत वाढविले. त्यानंतर शेतक-यांनी हे आंदोलन मागे घेतले.राहाता बाजार समितीमध्ये नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी कांदा लिलाव सुरु झाले. राहाता बाजार समितीत नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर येथील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. अकरा वाजता कांद्याचे लिलाव सुरु झाले. व्यापा-यांनी एक नंबर कांद्याला सहाशे रुपये भाव काढला. त्यामुळे शेतक-यांनी संतप्त होत घोषणाबाजी सुरु करीत लिलाव बंद पाडले. त्यानंतर संतप्त शेतकरी बाजार समितीच्या गेटसमोरील नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले. या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या दुरवर रांगा लागल्या होत्या. बाजार समितीचे संचालकांनी शेतक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतक-यांनी बाजारभाव वाढवून मागण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे बाजार समिती संचालकांनी व्यापा-यांशी चर्चा करुन कांद्याचे फेरलिलाव करण्याचा निर्णय घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत शिवप्रहार संघटनेचे सचिव चौघुले, बाजार समितीचे अध्यक्ष बापूसाहेब आहेर, सचिव उद्धव देवकर यांनी शेतक-यांशी संवाद साधला व भाव वाढ देण्याचे मान्य केले. त्यानंतर शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले आणि लिलाव पुन्हा सुरु झाले. फेरलिलावात एक नंबर कांद्याला १२०० रुपये भाव काढण्यात आला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता