शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कांदा निर्यातबंदी कांदा उत्पादकांवर अन्यायकारक, बंदी उठवण्याबाबत लक्ष घाला- आमदार निलेश लंके यांचे शरद पवार यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 13:45 IST

अहमदनगर: केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी (14 सप्टेंबर 2020) कांदा निर्यातीवर घातलेली बंदी हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे, अशी मागणीच पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे मंगळवारी केली. 

 

अहमदनगर: केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी (14 सप्टेंबर 2020) कांदा निर्यातीवर घातलेली बंदी हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे, अशी मागणीच पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे मंगळवारी केली. 

या निवेदनात आमदार लंके यांनी म्हटले आहे की, बंदीचा हा निर्णय शेतकरी हिताचा नाही. महाराष्ट्रात कांदा पीक हे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे. माझ्या संपूर्ण मतदारसंघात कांदा हे पीक शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा आर्थिक प्रगतीचे विषय आहे.   महाराष्ट्रातील शेतकरी आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत.  या सरकारला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही. कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होतील. कांद्याचे भाव जेव्हा कोसळतात त्यावेळी केंद्र शासन कधी अनुदान देते का ? शेतकऱ्यावर कोरोनाचे मोठे संकट असताना कांदा साठवण करून ठेवणे हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.  त्यात निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांवर कोरोनापेक्षा मोठे संकट आलेले आहे. 

 

कांदा उत्पादक शेतकरी भविष्यात केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून रस्ता लोक रास्ता रोको आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही

 

तसेच सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आंदोलन करणे योग्य होणार नाही.  त्यामुळे केंद्र शासनाने हा निर्णय मागे घ्यावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.  तसेच माझ्या पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघात कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात असल्याने सोमवारी झालेल्या निर्णयामुळे बऱ्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधून आपण या निर्णयाबाबत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना सांगून लक्ष घालावे असे सांगितले आहे.  त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना आपण आशेचा किरण आहात.  या अनुषंगाने केंद्र सरकारचा निर्यात बंदीबाबत घेतलेला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडावे , असे साकडे आमदार निलेश लंके यांनी पवार यांना दिलेल्या निवेदनात घातले आहे. 

या भेटीनंतर शरद पवार यांनी थेट केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना निर्यातबंदी उठवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे, असे आमदार लंके यांनी सांगितले.

 
टॅग्स :Ahmednagarअहमदनगरonionकांदा