शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मायंबा घाटात कार कोसळून एका महिलेचा मृत्यू; तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 19:20 IST

मढी-मच्छिंद्रनाथगडाच्या रस्त्यावरील मायंबा घाटातील ८० फूट खोल दरीत कार कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी आहेत.

मढी : पाथर्डी तालुक्यातील मढी-मच्छिंद्रनाथगडाच्या रस्त्यावरील मायंबा घाटातील ८० फूट खोल दरीत कार कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी आहेत. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. कार मच्छिंद्रनाथगडाकडून खरवंडीकडे (ता. पाथर्डी) चालली होती.बकुळा लक्ष्मण वाघ (वय ४८, रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी) असे मृत महिलेचे नाव आहे. माधुरी वसंत खाडे (वय ३२, रा. खेड, जि. सातारा), असे एका जखमी महिलेचे नाव आहे. ही महिलाच कार चालवत असल्याची माहिती मिळाली. इतर दोन जखमींची नावे समजू शकली नाहीत.मूळचे सातारा जिल्ह्यातील भाविक मच्छिंद्रनाथ गडावर देवदर्शन आटोपून खरवंडी (ता. पाथर्डी) येथे कारमधून पाहुण्यांकडे चालले होते. कारमध्ये चौघे होते. यामध्ये दोन महिला व दोन पुरुष होते. माधुरी खाडे या कार चालवत होत्या. घाट उतरत असताना कार ८० फूट खोल दरीत कोसळली. यात कार चालक माधुरी खाडे  या जखमी झाल्या. दोन इतर प्रवासीही गंभीर जखमी असून त्यांच्यावर पाथर्डी येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघाताची माहिती कळताच मढी येथील बबनराव मरकड, रवी आरोळे, रोहित अकोलकर, असिफ शेख, सोहेल मोमीन, आकाश साळवे आदींसह पोलीस प्रशासनाने जखमींना मदत केली. निमुळत्या रस्त्याचा व धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घाटातून जाणाºया रस्त्याला संरक्षक कठडेही बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. याबाबत मढी देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर राजळे म्हणाले, दोन्ही देवस्थानच्या माध्यमातून रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. याबाबत ‘लोकमत’नेही वृत्त मालिका लिहून लक्ष वेधले होते. --

टॅग्स :Pathardiपाथर्डीAccidentअपघात