कोतूळ : परिसरातील भोळेवाडी शिवारात रानडुकराच्या हल्ल्यात भोळेवाडी सोसायटीचे चेअरमन जखमी झाले आहेत.भोळेवाडी येथील शिवारात आज दुपारी तीन वाजता भोळेवाडी सोसायटी चे चेअरमन बाळासाहेब ऊर्फ भाऊसाहेब उत्तम देशमुख हे आपल्या शेतात पाइपलाईनचा वॉल्व्ह सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक पाठीमागून रानडुकराने हल्ला केला. त्यात देशमुख यांच्या पायाला चावा घेतल्याने ते जबर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी संगमनेर येथे हलविण्यात आले आहे.दरम्यान भोळेवाडी शिवारात रान डुकरांच्या त्रासाने रात्री शेतीत पाणी देण्यासाठी जात नाहीत. शेतीपिकांचे मोठे नुकसान केले जात असल्याने वन विभागाने त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी राजेंद्र देशमुख, किरण देशमुख, रेवण देशमुख, रमेश देशमुख, अभिजित देशमुख, दिलीप देशमुख, दौलत देशमुख, पोलिस पाटील सतिश देशमुख यांनी केली आहे.
भोळेवाडी शिवारात रानडुकरांचा हल्ला : एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 17:25 IST