शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निघोज, पिंपरी जलसेन गावात शंभर टक्के लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 20:22 IST

पारनेर/ निघोज : येथील रहिवासी असलेला व  पिंपरी जलसेनच्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने निघोज आणि पिंपरी जलसेन ही दोन्ही गावे शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आली आहेत. सध्या या भागात अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, रहदारी बंद करण्यात आली आहे.

पारनेर/ निघोज : येथील रहिवासी असलेला व  पिंपरी जलसेनच्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने निघोज आणि पिंपरी जलसेन ही दोन्ही गावे शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आली आहेत. सध्या या भागात अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, रहदारी बंद करण्यात आली आहे.तसेच या गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधिताच्या मृत्युमुळे प्रशासन व तालुका हादरला आहे. गुरुवारी सकाळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, सरपंच ठकाराम लंके यांनी निघोज, पिंपरी जलसेन येथे लॉकडाऊनचा आढावा घेतला. सगळीकडे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. निघोज, पिंपरी जलसेन येथील अनेक कुटुंब, संपकार्तील व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांना शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे.पती-पत्नी, दोन चिमुकल्यांना बरोबर घेऊन लॉकडाऊनचा नियम मोडून घाटकोपर येथून पिंपरी जलसेनला आले. तेथे शाळेत क्वारंटाईन होण्याऐवजी घरी जाऊन बसले. कोरोनासारखी लक्षणे असतानाही सरकारी रुग्णालयात दाखल होण्यासाठी उशीर केला. कोरोनाबाबत काळजी घेण्याऐवजी स्वत:चा आणि कुटुंबियांच्या निष्काळजीपणामुळेच त्या कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू झाल्याचा घटनाक्रमच आता समोर आला आहे.-------अनेकांच्या जीवाला घोरपिंपरी जलसेनच्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता पिंपरी जलसेनमधील त्याचे जवळचे दहा नातेवाईक, निघोज येथील डॉक्टर, पठारवाडीतील आत्या, पिकअपचा चालक, दोन मोटारसायकलस्वार व या सर्वांचे कुटुंब, मित्र परिवार यांची साखळी आता शोधून काढण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. पारनेर तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आणि अनेकांच्या जिवाला घोर लागला आहे.