श्रीगोंदा : जिल्हा सहकारी बँकेने लोणी व्यंकनाथ सोसायटीला खावटी कर्जापोटी ६ कोटी ५३ लाख रुपये दिले होते. या कर्जाची ३१ मार्चअखेर अवघ्या तीन दिवसात ६ कोटी ८१ लाख इतकी शंभर टक्के परतफेड केली आहे, अशी माहिती बाळासाहेब नाहाटा यांनी दिली.
लोणी व्यंकनाथ सोसायटीने विविध प्रकारची ३५ कोटींची कर्ज घेतली आहेत. त्यामुळे खेळते भांडवल कर्जापोटी ९५० सभासदांनी ६ कोटी ५३ लाख रूपये घेतले होते. लोणी व्यंकनाथ सोसायटीने खेळत्या भांडवलापोटी जिल्ह्यात सर्वात जास्त कर्ज उचलले होते. या कर्जावर परतफेड होईल का? यावर शंका उपस्थित केली होती. मात्र, सभासदांनी बँकेने दिलेल्या या कर्जाची १०० टक्के परतफेड केली. सभासदांनी बँकेचे अधिकारी, संचालकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. लोणी व्यंकनाथ सोसायटीचे गुढीपाडव्यापासून तालमीच्या चौकात स्थलांतर करण्यात येणार आहे, असे नाहाटा यांनी सांगितले.