आॅनलाईन लोकमतसंगमनेर (अहमदनगर), दि़ ८ - संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथे बोअर घेण्याचे काम चालू असताना वीज पडून एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला़ रविवारी सायंकाळी कोकणगाव येथील एका शेतात बोअर घेण्याचे काम सुरु होते़ यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला़ वीजेच्या गडागडाटासह जोराचा पाऊस सुरु असताना बोअरमशीन असलेल्या गाडीजवळ राजेश श्रीमंगलू आखंडे (मु़अंजिरा, ता़ इटारसी, जि़होशांगाबाद, राज्य मध्यप्रदेश) या कामगार उभा होता़ त्याचवेळी प्रचंड गडगडाटासह एक वीज कोसळली़ यात त्याचा जागीच मृत्यू झाला़
वीज पडून एकाचा मृत्यू
By admin | Updated: May 8, 2017 14:31 IST