शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

राळेगणसिद्धी ग्रामस्थांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 16:13 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून अण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण संत यादवबाबा मंदिरामध्ये सुरू आहे.

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून अण्णांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण संत यादवबाबा मंदिरामध्ये सुरू आहे.मारूती हजारे म्हणाले, अण्णांचे उपोषण लवकर सुटावे, ही सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. अण्णांच्या मागण्या सरकारला मान्यच कराव्या लागतील. अण्णांचा स्वभाव हा पहिल्यापासूनच एक काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नाही. हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, आणि लोकपाल, लोकायुक्त व शेतक-यांचे प्रश्न यावर मोदी सरकारला तत्काळ निर्णय घ्यावे लागतील.अण्णांचे ज्येष्ठ सहकारी सावळेराम पठारे म्हणाले, अण्णा नेहमी देश व समाजाचाच विचार करतात. या मतलबी सरकारला अण्णांची काहीच काळजी नाही. सरकारने अधिक अंत न पाहता लवकरात लवकर अण्णांच्या मागण्या मंजूर कराव्यात, उपोषण सोडावे.उपोषणाचा दुसरा दिवसअण्णांचे उपोषण चालू होऊन जवळ पास २४ तासांपेक्षा अधिक वेळ झाला आहे. काल अण्णांचा रक्तदाब जास्त होता तो आज नियंत्रणात आला आहे. वजन अर्ध्या किलोपेक्षा कमी झाले असून शुगरही कमी झाली आहे. दुस-याच दिवशी अण्णांना थकवा आला आहे. अण्णांचे वय व वातावरण याचा विचार करता अण्णांनी अधिक बोलू नये तसेच जास्त वेळ विश्रांती घेणे सध्या योग्य राहिल असे डॉ. धनंजय पोटे यांनी सांगितले.अण्णांच्या आंदोलनाला परिसरातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद वाढत असून आज दिवसभरामध्ये पारनेर, वडुले, पिंपळनेर, पानोली, जातेगाव, शिरूर तसेच तालुक्यातील आणि नगर जिल्ह्यातील अनेकांनी अण्णांना प्रत्यक्ष भेटून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणामध्येही सर्वजण सहभागी झाले होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे