पारनेर : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर मधील वसंतदादा पतसंस्थेत सुमारे एक कोटी एक लाख रूपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपहारप्रकरणी संचालक मंडळ, व्यवस्थापकांसह ३४ जणांविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. टाकळी ढोकेश्वरमधील दोन डॉक्टर, प्राथमिक शिक्षक ,मंत्रालयातील बांधकाम विभागातील अधिकारी यांचा यात समावेश आहे.टाकळी ढोकेश्वर येथील वसंतदादा पतसंंस्थेत २०१२ ते २०१३ या काळात संस्थेचे संचालक मंडळ, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवींमध्ये एक कोटी, एक लाख ८९ हजार रूपयांचा अपहार केल्याची फिर्याद लेखापरीक्षक लहानु वामन थोरात यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिली आहे.संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष राजेंद्र रघुनाथ गागरे, सोमनाथ किसन झावरे, नारायण यशवंत झावरे, विलास राजाराम नवले, विजय बबन पुरी, कृष्णा भाऊसाहेब बांडे, दत्तात्रय रामदास बांडे,भगवान राजाराम वाघ, हरिभाऊ चिमाजी नऱ्हे, हेमा गोधा मधे, अश्विनी अंकुश खिलारी, अनिल बीरदीचा गांधी, जगन्नाथ काशीनाथ जगधने, जयसिंग कोंडीबा खोडदे, अंकुश एकनाथ खिलारी, टाकळी ढोकेश्वर, वनकुटा सेवा संस्थेचा माजी अध्यक्ष अशोक जगन्नाथ गागरे, सुनंदा भाऊसाहेब पायमोडे, तात्याभाऊ केशव मुसळे, उत्तम सोपान वाबळे, संदीप बबन झावरे, शिवाजी किसन पायमोडे, अशोक भिमाजी बिडे, मुकतार कुतूबुद्दीन शेख, संपत गोपाजी वांळुज, श्रीकांत पोपट झावरे, काकणेवाडी, सर्जेराव सुंदर घंगाळे, रा.हिवरे कोरडा व जामखेड येथील सोपान सुधीर मोरे व निर्मला सुधीर मोरे यांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात संगनमताने अपहार करून ठेवीदारांची फसवणुकीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. (तालुका प्रतिनिधी) सूडबुध्दीने गोवण्याचा प्रयत्नआम्ही वसंतदादा पतसंस्थेचे दोन संचालक मंडळ अस्तित्वात होते. आमची निवडणूक झाली.नंतर गडबडी झाल्या आहेत.नंतर पतसंस्था वर्धमान पतसंस्था राहाता यांच्यात विलीन झाली.यात आम्हाला सूडबुध्दीने गोवण्याचा प्रयत्न आहे.मला लक्ष्य करून मागील वर्षीचा अहवालावरून त्यांनी आम्हाला नोटिसा पाठविल्या होत्या.- राजेंद्र गागरे, चेअरमन, वसंतदादा पतसंस्था, टाकळी ढोकेश्वर ता. पारनेरवर्धमान चा संबंध नाही...वाकडी येथील वर्धमान पतसंस्थेकडे तीनच महिने आर्थिक व्यवहार होते.त्यामुळे त्यांचा संबध नाही.वसंतदादा पतसंस्थेचे आम्ही लेखापरीक्षण केल्यावर वसंतदादा पतसंस्थेच्या संचालक व कर्मचाऱ्यांनीच गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे.यात जिल्हा उपनिबधंकांनीच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.यात कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार नाही.- लहु थोरात, लेखापरीक्षक.
वसंतदादा पतसंस्थेत एक कोटींचा अपहार
By admin | Updated: August 23, 2014 00:44 IST