आरोपी रावसाहेब ससाणे हा दुपारी एक वाजेदरम्यान कात्रड येथे जागा खोदत होता. यावेळी बिरेंद्र चौबे ससाणेला म्हणाला, या जागेची मोजणी झाल्यानंतर तू खोदकाम कर. यावेळी आरोपी रावसाहेब ससाणे याने त्याच्या हातातील लाकडी काठी बीरेंद्र चौबे यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. यावेळी चौबे यांच्या पत्नी भांडण सोडविण्यासाठी आल्या. त्यावेळी इतर आरोपींनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.
बीरेंद्र सभापत चौबे (वय ४४, रा. कात्रड ता.राहुरी) यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून रावसाहेब नाथा ससाणे, लक्ष्मण रावसाहेब ससाणे, विश्रांतीबाई रावसाहेब ससाणे आणि सुनिता ससाणे या चार जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहेत.