शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जवळा येथील डॉक्टरच्या खूनप्रकरणी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:36 IST

स्वस्तातील सोने घेण्यासाठी तालुक्यातील जवळा येथे आलेल्या दोन डॉक्टरला (मूळव्याध) चार चोरट्यांनी बनावट सोने दिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची होऊन झटापट झाली. यावेळी त्यामध्ये एक डॉक्टरचा जागीच मृत्यू पावला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता.

जामखेड : स्वस्तातील सोने घेण्यासाठी तालुक्यातील जवळा येथे आलेल्या दोन डॉक्टरला (मूळव्याध) चार चोरट्यांनी बनावट सोने दिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची होऊन झटापट झाली. यावेळी त्यामध्ये एक डॉक्टरचा जागीच मृत्यू पावला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. या हत्या प्रकरणातील चार पैकी एकाच्या मुसक्या आवळण्यात जामखेड पोलिसांना यश आले. न्यायालयाने या आरोपीस पाच दिवसांची कोठडी दिली आहे.डॉ श्रीकृष्ण जोगेश हालदार व मनोरंजन जोगेश हालदार (रा. भंडारवाडी ता. जि. उस्मानाबाद) हे दोघे मूळव्याध डॉक्टर आहेत. यातील श्रीकृष्ण याचा चोरट्यांनी २७ मार्च रोजी स्वस्तात सोन्याच्या अमिषाने खून केला होता. तर त्याचा भाऊ मनोरंजन चोरट्यांच्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी जखमी मनोरंजन हालदार यांच्या मोबाईलवरील आलेल्या क्रमांकावरील नंबरची पडताळणी करून आरोपीचा शोध घेतला. गुरुवारी सकाळी नऊ वाजता एका गुप्त खबऱ्याकडून या हत्यातील आरोपी टाकळी (ता.करमाळा) येथे उजनी बॅकवॉटर परिसरात निर्जन ठिकाणी पत्र्याचे शेड असलेल्या ठिकाणी आरोपी बेळ्या टकाºया काळे असल्याची खबर मिळाली. यावरून प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पगार, उपनिरीक्षक नामदेव सहारे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा केकाण, बापू गव्हाणे, पि. सी. लोखंडे, श्यामसुंदर जाधव, गणेश साने, अमिन शेख, बाजीराव सानप, मोबाईल सेल पोलीस आर्केल व महिला पोलीस कर्मचारी राणी व्यवहारे आदींनी सदर घटनास्थळी जाऊन पत्र्याच्या शेडला जाऊन गराडा घातला. तेथे आरोपी बेळ्या काळे इतर तीन पुरुष व काही महिला हे गप्पा मारताना आढळून आले. पोलिसांना पाहताच इतर तीन पुरुष पळून गेले. यातील काही महिलांनी व आरोपींनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव सानप किरकोळ जखमी झाले. अखेर पोलिसांनी आरोपी बेळ्या काळे याच्या मुसक्या आवळल्या व अटक केली. एका महिलेसह इतर दोन आरोपींच्या शोधात पोलीस आहेत. पोलिसांनी आरोपी बेळ्या काळे यास शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड