शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध दाम्पत्याचे धूम स्टाईलने लांबविले एक लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 19:39 IST

गावाकडचा जुना वाडा विकून वृद्ध दाम्पत्याला मिळालेले १ लाख ५ हजार रुपये दोघा चोरट्यांनी धूमस्टाईलने हिसकावून नेले़

अहमदनगर : गावाकडचा जुना वाडा विकून वृद्ध दाम्पत्याला मिळालेले १ लाख ५ हजार रुपये दोघा चोरट्यांनी धूम स्टाईलने हिसकावून नेले़ केडगाव येथील झेंडे कॉम्प्लेक्सजवळ मंगळवारी (दि़३) सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली़ याप्रकरणी सुंदरबाई सीताराम म्हस्के (वय ७५ रा़ मुळे कॉलनी, शाहूनगर केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ सुंदरबाई म्हस्के व त्यांचे कुटुंब केडगाव येथे राहते़ त्यांचा नगर तालुक्यातील दहिगाव येथे एक जुना वाडा होता़ म्हातारपणात पैशांचा आधार असावा म्हणून त्यांनी हा जुना वाडा विकला़ मंगळवारी नगर येथे शासकीय कार्यालयात विक्रीचा व्यवहार पूर्ण होऊन त्यांना १ लाख ५ हजार रुपये मिळाले़ सुंदरबाई व त्यांचे पती सीताराम हे पैसे घेऊन रिक्षाने केडगाव येथे निघाले़ पैशाची बॅग सुंदरबाई यांच्याकडे होती़ याचवेळी पाळत ठेवलेल्या दोघा चोरट्यांनी या वृद्ध दाम्पत्याचा विना क्रमांकाच्या मोटारसायकलवरून पाठलाग केला़ रिक्षा केडगाव येथील झेंडे कॉम्प्लेक्स जवळ जाताच मोटारसायकलवर मागे बसलेल्या एका चोरट्याने बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला़ यावेळी सुंदरबाई यांनी प्रतिकार केला मात्र चोरट्याने जोराचा झटका देऊन बॅग हिसकावून नेली़ यावेळी सुंदरबाई यांच्या हातातील बांगड्या फुटून त्यांना जखम झाली़ दरम्यान हे दोघे चोरटे घटनास्थळाजवळील दुकानांसमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत़ याप्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ हे करत आहेत़ 

टॅग्स :theftचोरीAhmednagarअहमदनगर