शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीवर जुन्याचीच वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:01 IST

महापालिकेच्या स्थायी समितीवर राष्ट्रवादीसह, सेना, भाजप आणि काँग्रेसने कारभाराचा अनुभव असलेल्या जुन्या चेहऱ्यांना संधी दिली आहे़ नव्याने निवडून येणाºयांना स्थायी समिती सदस्य होण्याची आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीवर राष्ट्रवादीसह, सेना, भाजप आणि काँग्रेसने कारभाराचा अनुभव असलेल्या जुन्या चेहऱ्यांना संधी दिली आहे़ नव्याने निवडून येणाºयांना स्थायी समिती सदस्य होण्याची आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी व महिला बालकल्याण समिती सदस्य निवडीसाठीची सभा शुक्रवारी पार पडली़ सभेला उपमहापौर मालन ढोणे, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, नगरसचिव एस़ बी़ तडवी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते़ सभेच्या सुरुवातीलाच सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्या सदस्यांची संख्या सांगण्यात आली़ त्यानुसार सर्वप्रथम गटनेत्यांकडून स्थायी समिती सदस्यांची यादी बंद पाकिटात मागविण्यात आली़ राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनी स्थायी समितीवर नियुक्त करावयाच्या सदस्यांची नावे दिली़ ती महापौर वाकळे यांनी सभागृहात वाचून दाखविली़ राष्ट्रवादीकडून स्थायी समितीच्या सदस्यपदी अविनाश घुले, गणेश भोसले, दीपाली बारस्कर, कुमार वाकळे, शोभा बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी बंद पाकिटात सदस्यांची नावे दिली़ सेनेकडून योगिराज गाडे, गणेश कवडे, सुभाष लोंढे, अमोल येवले, सुवर्णा जाधव, विद्या खैरे यांची निवड करण्यात आली आहे़ भाजपकडून स्थायी समितीसाठी नगरसेविका आशा कराळे, सोनाली चितळे, मनोज कोतकर यांना संधी देण्यात आली आहे़ काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव यांनी दिलेल्या बंद पाकिटात नगरसेविका संध्या पवार यांचे नाव निघाले़ बसपाचे गटनेते मुद्दसर शेख यांची स्थायीवर वर्णी लागली आहे़ राष्ट्रवादीसह शिवसेना, भाजप आणि काँग्रेसकडून जुन्या जाणत्यांनाच संधी देण्यात आली आहे़ निवडणुकीनंतर प्रथमच स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यात आली़सर्वच राजकीय पक्षांतील नगरसेवकांना स्थायीवर जाण्याची संधी मिळणार आहे़ पण, पहिल्यांदा महापालिकेच्या कारभाराचा अनुभव असणाºयांना संधी देण्यात आली आहे़महिला बालकल्याण समिती सदस्य भाजप- लता शेळके, गौरी नन्नवरे, सोनाबाई शिंदेशिवसेना- रिता भाकरे, कमल सप्रे, पुष्पा बोरुडे, सुवर्णा ग्यानप्पा, सुनीता कोतकर, मंगल लोखंडेराष्ट्रवादी- ज्योती गाडे, मीना चव्हाण, परवीन कुरेशी, मीना चोपडा, शोभा बोरकर,बसपा-अनिता पंजाबी, काँग्रेस- रिजवाना शेखसेनेकडून महापौर लक्ष्यसभेच्या सुरुवातीलाच सेनेचे नगरसेवक अनिल शिंदे यांनी महापौरांवर तोफ डागत अंदाजपत्रक महासभेत घेऊन त्यास मंजुरी घेण्याची मागणी केली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर