शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विखेंच्या आदेशाला अधिका-यांकडून केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 19:43 IST

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करण्याच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिलेल्या आदेशाला विभागप्रमुखांनी केराची टोपली दाखविल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी नेमकं कुणाचे काम करतात, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करण्याच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनी दिलेल्या आदेशाला विभागप्रमुखांनी केराची टोपली दाखविल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी नेमकं कुणाचे काम करतात, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विखे यांनी जिल्हा परिषदेच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला. संबंधित मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदन दिले़ मंत्र्यांना निवेदन देऊन कामे मार्गी लागत नाहीत. त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो़ त्यामुळे अध्यक्षा विखे यांनी जिल्हा परिषदेतील संबंधित विभागाच्या अधिका-यांना मंत्रालयात पाठपुरावा करण्याचा आदेश दिला होता. मात्र एकाही खातेप्रमुखाने मंत्रालयात जाऊन कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला नसल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आले आहे. त्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांना यासंदर्भात कळविले असून, संबंधित खाते प्रमुखांकडून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागविला आहे.जिल्हा परिषदेचे जमीन महसुलाचे २१ कोटींचे अनुदान शासनाकडे थकीत आहे़ सन २०१५,१६ आणि १७, या तीन वर्षांत मुद्रांक शुल्काचे ५ कोटी १३ लाखांच्या कपात केलेल्या निधीची ग्रामपंचायतनिहाय माहिती जिल्हा परिषदेकडे नाही, हे सर्व विषय ग्रामपंचायत विभागाशी संबंधित आहेत. बीओटी प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी देण्याचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. शाळांतील वीज बिलाची आकारणी कृषी दराने करण्याची जिल्हा परिषदेची मागणी आहे़ मात्र त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही़ दुधाळ जनावरे खरेदीसाठी ४० हजार मिळतात़ त्यात वाढ करून ६० हजार रुपये करावे, अशी जिल्हा परिषदेची मागणी आहे. पशूवैद्यकीय ११ दवाखाने शासन समायोजित करावेत. पशूसंवर्धन विभागाने प्रयोगशाळा बांधल्या आहेत़ परंतु, प्रशिक्षित कर्मचा-यांअभावी कामकाज बंद आहे. ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या आधारे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याची जिल्हा परिषदेची मागणी आहे. वृध्द कलावंतांच्या निवडीच्या संख्येत वाढ करावी, यासह जिल्हा परिषदेचे इतर प्रश्न प्रलंबित आहेत.

प्रशासन व्हिडीओ कॉन्फरन्स, बैठकांत व्यस्त

मंत्रालयातून विविध विभागाचे मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे अधिका-यांशी चर्चा करतात. दररोज कोणत्या ना कोणत्या विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्स असते. कधी कधी तर अचानक निरोप धडकतात. त्यामुळे अधिका-यांचा सर्वाधिक वेळ कॉन्फरन्स व बैठकांमध्ये जातो.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShalini Vikhe Patilशालिनी विखे पाटील