शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापित पक्षांकडून ओबीसी ‘वंचित’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 05:20 IST

आरक्षणासाठी आग्रही असलेल्या धनगर समाजाला या वेळी एकाही प्रमुख पक्षाने उमेदवारी दिलेली नाही.

- सुधीर लंके अहमदनगर : आरक्षणासाठी आग्रही असलेल्या धनगर समाजाला या वेळी एकाही प्रमुख पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. माळी समाजातून केवळ राष्टÑवादीने दोन, तर वंजारी समाजातून भाजपने एक उमेदवार दिला. मुस्लीम समाजालाही केवळ एक प्रतिनिधित्व आहे. मराठा व कुणबी समाजाचे प्रमाण गतवेळेएवढेच आहे. बौद्ध समाजाचा उमेदवारीचा टक्काही घटला आहे.राज्यातील ३९ मतदारसंघ खुले आहेत. या खुल्या मतदारसंघांत भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्टÑवादी या प्रमुख पक्षांनी दिलेल्या उमेदवारांचा जातनिहाय आढावा घेतला असता अनेक समाज उमेदवारीपासून वंचित असलेले दिसतात. धनगर समाजाचा वरील चार प्रमुख पक्षांनी उमेदवारीसाठी विचार केलेला नाही. २०१४ मध्ये महादेव जानकर हे युतीकडून बारामतीतून लढले होते.गोपीनाथ मुंडे यांनी या वंजारी समाजाला राजकीय प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले. या समाजाला भाजपने प्रीतम मुंडे यांच्या रूपाने एक जागा दिली. माळी समाजातून राष्टÑवादीने समीर भुजबळ व डॉ. अमोल कोल्हे हे दोन उमेदवार दिले आहेत. २०१४ मध्ये ही संख्या तीन होती.दक्षिण मध्य मुंबईत काँग्रेसने बौद्ध समाजाला संधी दिली आहे. २०१४ मध्येही बौद्ध समाजाचा काँग्रेस व भाजपनेच विचार केला होता. बौद्धेतर दलित समाजात काँग्रेसने तीन, सेनेने तीन, तर भाजपने एक उमेदवार दिला आहे. राष्टÑवादीने अमरावतीत अपक्षाला पाठिंबा दिला आहे. मुुस्लीम समाजाला २०१४ च्या निवडणुकीत प्रमुख चार पक्षांपैकी केवळ काँग्रेसने एक जागा दिली होती. या वेळी तीच स्थिती आहे. आगरी समाजाला प्रमुख पक्षांकडून चार जागांवर संधी मिळाली आहे.तेली, शेट्टी, कायस्थ, मारवाडी, गुजराती, जैन, खाटिक, लिंगायत, भंडारी या समाजांना प्रत्येकी एका जागेवर संधी मिळाली आहे. गवळी व लेवापाटील समाजाला प्रमुख पक्षांनी प्रत्येकी दोन जागा दिल्या आहेत.>मराठा समाजाचे उमेदवार वाढलेया निवडणुकीत खुल्या ३९ मतदारसंघांपैकी दोन्ही काँग्रेसने १४ तर सेना-भाजप युतीने २२ मतदारसंघांत मराठा उमेदवार दिलेले दिसतात. याशिवाय कुणबी समाजाला काँग्रेस आघाडीने सहा तर युतीने चार जागांवर संधी दिली आहे. २०१४ च्या तुलनेत मराठा समाजाचे उमेदवार वाढले आहेत. या वेळी १५ मतदारसंघांत मराठा विरुद्ध मराठा तर तीन मतदारसंघांत कुणबी विरुद्ध कुणबी अशी लढत आहे.>ब्राह्मण समाजाचे सात उमेदवार : ब्राह्मण समाजाला सर्वच प्रमुख पक्षांनी संधी दिली आहे. एकूण सात ब्राह्मण उमेदवार या वेळी रिंगणात आहेत. गतवेळी ही संख्या सहा होती.>वंचित आघाडीचे सोशल इंजिनीअरिंगवंचित आघाडीने धनगर समाजाला सात, माळी समाजाला दोन, वंजारी समाजाला एक, मुस्लीम पाच व बौद्ध समाजाला नऊ जागांवर संधी दिली आहे. मराठा, कुणबी, भूमिहार ब्राह्मण या समाजांना प्रत्येकी एक जागा देण्यात आली. वडार, कैकाडी, तेली, विश्वकर्मा, धीवर आदी जातींनाही उमेदवारी दिली आहे. सर्व जातींना प्रतिनिधित्वाचे प्रकाश आंबेडकरांचे धोरण आहे, असे आघाडीचे राज्य निमंत्रक किसन चव्हाण यांनी सांगितले.>बसपाने सर्वच जातीधर्मातून उमेदवार देत राजकीय प्रक्रियेत सामाजिक समतोल राखला आहे.- सुरेश साखरे,प्रदेशाध्यक्ष बसपा.>बौद्ध समाजाची लोकसंख्या मोठी असताना या समाजाचे अस्तित्वच राजकारणात नाकारले जात आहे. रामदास आठवले, कवाडे यांच्या पक्षांना एकही जागा दिलेली नाही. बौद्ध समाजाला गृहीत धरले जाते.- अशोक गायकवाड, संस्थापक अध्यक्ष, युनायटेड रिपब्लिकन पक्ष.

माळी समाजाला राष्टÑवादी व मित्र पक्षाने उमेदवारी दिली, इतर पक्षांनी नाही. अशी उपेक्षा नको.- बापूसाहेब भुजबळ, उपाध्यक्ष समता परिषद.प्रस्थापित पक्षांनी धनगर समाजाला डावलले. वंचित आघाडीने या समाजाला प्रतिनिधित्व दिले.- डॉ. इंद्रकुमार भिसेकुठलाच पक्ष वंजारी समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व देत नाही. एखादी जागा दिली म्हणजे पुरे झाले असा विचार पक्षांनी करायला नको.- अ‍ॅड. भास्करराव आव्हाड, अभ्यासक.मराठा समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व आहे. पण सर्व प्रस्थापित चेहरे आहेत.- शिवानंद भानुसे, प्रवक्ता संभाजी ब्रिगेडलोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व देणे अपेक्षित होते. मात्र केवळ एक उमेदवारी मिळाली.- अर्शद शेख, सामाजिक अभ्यासकब्राह्मण समाजाचे पाचच उमेदवार आहेत. त्यातही पुण्यात आपसात लढत आहे. - गोविंद कुलकर्णी, राष्टÑीय अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019OBCअन्य मागासवर्गीय जातीahmednagar-pcअहमदनगर