अहमदनगर : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे फक्त ५३० रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरातील रुग्णांची संख्याही घटली असून, ती २३ वर आली आहे. रुग्णसंख्या घटल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही ५ हजार ४४० पर्यंत कमी झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी १,१३४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६० हजार ९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६७ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ५३४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ४४० इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४० आणि अँटिजन चाचणीत २६९ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (२३), राहाता (२०), संगमनेर (५८), श्रीरामपूर (२६), नेवासा (५७), नगर तालुका (२९), पाथर्डी (४६), अकोले (२८), कोपरगाव (२४), कर्जत (३७), पारनेर (४५), राहुरी (२८), भिंगार (०), शेवगाव (५५), जामखेड (१६), श्रीगोंदा (३६), इतर जिल्हा (७), इतर राज्य (०), मिलिटरी हॉस्पिटल (०) येथील रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार १८ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची पोर्टलवर नोंद झाली आहे.
-------
कोरोनास्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : २,६०,०९२
उपचार सुरू असलेले रुग्ण : ५,४४०
मृत्यू : ३,५३१
एकूण रुग्णसंख्या : २,६९,०६३
---------