अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. बुधवारी एकाच दिवसात १२२४ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. सर्वाधिक २९१ रुग्ण संगमनेर तालुक्यात आढळले असून, पारनेर तालुक्यातही १६६ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पाच हजार ४२२ इतकी झाली आहे.
कोरोनाच्या रुग्णांची मंगळवारी संख्या कमी झालेली असताना बुधवारी त्यात पुन्हा दुपटीने वाढ झाली आहे. बुधवारी ५९७ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर १२२४ नव्या बाधितांची नोंद झाली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०९ टक्के असले तरी रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १२९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६५७ आणि अँटिजन चाचणीत ४३८ रुग्ण बाधित आढळले. एकाच दिवसात आढळून आलेल्या १२२४ रुग्ण आढळून आले. त्यामध्ये संगमनेर (२९१), पारनेर (१६६), कर्जत (९६), जामखेड (९४), नगर ग्रामीण (८५), श्रीगोंदा (६८), राहुरी (६४), पाथर्डी (५५), राहाता (५५), नेवासा (५२), शेवगाव (४२), श्रीरामपूर (४२), अकोले (४०), कोपरगाव (३६), महापालिका (२४), इतर जिल्हा (१२), भिंगार (२) येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, दोन दिवसात २० जणांचा मृत्यूची नोंद जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर करण्यात आली आहे. दरम्यान, पारनेर, संगमनेर, पाथर्डी आणि कर्जत तालुक्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.
--------------
कोरोना स्थिती
एकूण रुग्णसंख्या : २,९६,३२२
बरे झालेली रुग्णसंख्या : २,८४,७४८
उपचार सुरू असलेले रुग्ण : ५४२२
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६१५२
--------------