शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता आॅनलाईन अर्जावरच वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 11:43 IST

येत्या नोव्हेंबरपासून शहरी भागात नवीन वीजजोडणी आणि नावात बदल या सुविधांसाठी केवळ आॅनलाईन अर्जच स्वीकारले जाणार आहेत.

अहमदनगर : येत्या नोव्हेंबरपासून शहरी भागात नवीन वीजजोडणी आणि नावात बदल या सुविधांसाठी केवळ आॅनलाईन अर्जच स्वीकारले जाणार आहेत. पारदर्शक व गतिमान ग्राहक सेवेसाठी महावितरणने हे पाऊल उचलले आहे.तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेऊन महावितरणने पुढाकार घेत नवीन वीजजोडणीसाठी विविध आॅनलाईन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यात मोबाईल अ‍ॅप, संकेतस्थळ, मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र, हेल्पलाईन क्रमांक आदींचा समावेश आहे. उपलब्ध सुविधांचा अधिकाधिक वापर अपेक्षित होता व त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. मात्र ग्रामीण भागासोबतच शहरी भागातही या सुविधेचा लाभ घेऊन नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे समोर आले आहे.दुसरीकडे कार्यालयात येऊन आॅफलाईन अर्ज करणाºया ग्राहकांची संख्या वाढत आहे. या ग्राहकांना नवीन वीजजोडणी मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी मुख्य कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींचा आढावा घेतला असता स्थानिक कार्यालयात सादर झालेला ग्राहकाचा अर्ज प्रणालीत भरून पुढील प्रक्रिया पार पाडण्यात उशीर होत असल्याने अनेक अर्ज प्रलंबित असल्याचे मुख्य कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे महावितरणच्या शहरी भागात नवीन वीजजोडणीसाठी आॅफलाईन अर्ज स्वीकारणे बंद करून नोव्हेंबरच्या प्रारंभापासून केवळ आॅनलाईन अर्जच स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आॅनलाईन अर्जामुळे मानवी हस्तक्षेप टाळण्यासोबतच ग्राहकांना पारदर्शक व गतिमान सेवा देता येणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण