शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

साईदीप हॉस्पिटलमध्ये आता अद्ययावत कॅन्सर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST

अहमदनगर : विविध आजारांवर दर्जेदार उपचारांसाठी नावाजलेल्या साईदीप हॉस्पिटलमध्ये आता कॅन्सरवर परिपूर्ण उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

अहमदनगर : विविध आजारांवर दर्जेदार उपचारांसाठी नावाजलेल्या साईदीप हॉस्पिटलमध्ये आता कॅन्सरवर परिपूर्ण उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये अद्ययावत कॅन्सर उपचार विभाग सुरू होत आहे. या विभागात अचूक निदान व परिणामकारक उपचार रुग्णांना मिळणार आहेत. यात किमोथेरपी, टार्गेटेड किमोथेरपी, इम्युनोथेरपी व कॅन्सरवरील शस्त्रक्रिया करण्यात येतील, अशी माहिती साईदीपचे चेअरमन डॉ. एस. एस. दीपक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साईदीपमधील कॅन्सर विभागात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय अंदुरे, पुण्याचे प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ. भाग्यश्री खळदकर, डॉ. अमित पारसनीस, डॉ. पंकज क्षीरसागर हे पूर्ण वेळ सेवा देणार आहेत. सध्या विविध कारणांमुळे, वाढत्या व्यसनाधीनतेमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. कॅन्सरमध्ये वेळीच निदान होणे आणि त्वरित उपचार महत्त्वाचे असतात. रुग्णांना दर्जेदार उपचारांसाठी पुणे, मुंबई, चेन्नई, बंगलोर अशा महानगरांत जाण्याची गरज पडू नये, त्यांना नगरमध्येच माफक दरात चांगले उपचार मिळावेत, म्हणून साईदीप हॉस्पिटलने सेवा विस्तार केला आहे. उपचारांबरोबरच कॅन्सर प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे डॉ. दीपक यांनी सांगितले.

कॅन्सर तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय अंदुरे हे नगरचेच भूमिपुत्र आहेत. ते म्हणाले, सध्या कॅन्सर आजाराचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सरबाबत न घाबरता तपासणी, अचूक निदान केल्यास वेळीच प्रभावी उपचार करणं शक्य होते. यातून कॅन्सर पूर्ण बरा होऊ शकतो. अनुभवी मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट ( कॅन्सर तज्ज्ञ), कॅन्सर सर्जन, रेडिएशन तज्ज्ञ असल्याने कॅन्सरवरील प्रभावी उपचार रुग्णांना मिळतील. यावेळी साईदीप हॉस्पिटलचे संचालक डॉ. आर. आर. धूत, डॉ. कैलास झालानी, डॉ. रवींद्र सोमानी, डॉ. निसार शेख, डॉ. व्ही. एन. देशपांडे, डॉ. अनिल कुऱ्हाडे, डॉ. इकबाल, शेख, डॉ. शामसुंदर केकडे, डॉ. हरमीत कथूरिया, डॉ. संगीता कुलकर्णी, डॉ. अश्विन झालानी, डॉ. राहुल धूत, डॉ. किरण दीपक, डॉ. वैशाली किरण, डॉ. अनिकेत कुऱ्हाडे, डॉ. कस्तुरी कुऱ्हाडे, डॉ. रोहित धूत, डॉ. पायल धूत, आदी उपस्थित होते. (वा. प्र.)

--------

फोटो-२१साईदीप हॉस्पिटल

साईदीप हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तज्ज्ञ डॉक्टरांनी कॅन्सर उपचार विभागाची माहिती दिली. यावेळी डॉ. एस. एस. दीपक तज्ज्ञ.