शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात सोन्या बेग जेरबंद, दोन वर्षे फरार; छत्रपती संभाजीनगर, संगमनेर, श्रीरामपूर येथे २५ गुन्हे

By शिवाजी पवार | Updated: April 6, 2023 15:41 IST

विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या येथील कुख्यात सोन्या बेग याला शहर पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले.

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या येथील कुख्यात सोन्या बेग याला शहर पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले. त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर, राहाता, संगमनेर येथे गंभीर स्वरुपाचे २५ गुन्हे दाखल आहेत. 

दोन वर्षांपासून पोलिस बेग याच्या शोधात होते. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हा दाखल आहेत. शहरातील व्यापारी व नागरिकांना धमकावत तो दहशत निर्माण करत होता. बुधवारी भाजप कार्यकर्ता गणेश बिंगले याला बेग याने रस्त्यावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी बिंगले याने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. शहरातील डावखर रस्त्यावरील घरी बेग येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सापळा रचण्यात आला. त्यात बेग याला पकडण्यात यश आले. खुनाचा प्रयत्न, लूटमार आदी गुन्हे त्याच्यावर दाखल होते.

पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, शफीख शेख, रघुवीर कारखेले, बिरप्पा करमल, सोमनाथ गाडेकर, गौतम लगड, रमीजराजा अत्तार, गणेश गावडे, मच्छिंद्र कातखडे, अमोल गायकवाड यांनी ही कारवाई केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी