शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

आर्थिक परिस्थिती नाही, कामे कशी करणार ?

By admin | Updated: March 31, 2016 00:04 IST

अहमदनगर : ‘हार्ट आॅफ सिटी’ची जागा म्हणून ओळखली जाणारी चितळे रस्त्यावरील जागा बिल्डरच्या घशात घालण्यास युतीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे

अहमदनगर : ‘हार्ट आॅफ सिटी’ची जागा म्हणून ओळखली जाणारी चितळे रस्त्यावरील जागा बिल्डरच्या घशात घालण्यास युतीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. महापालिका निधीतून अथवा कर्ज काढून व्यापारी संकुल-भाजी मंडई उभारावी, असे लेखी पत्र युतीने महासभेत महापौर अभिषेक कळमकर यांना दिले. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही, तेथे कर्तृत्व तरी काय करणार? अशी हतबलता महापौर कळमकर यांनी मार्केटच्या चर्चेदरम्यान व्यक्त केली. मंगळवारी तहकूब झालेली अर्थसंकल्पीय सभा महापौर तथा पीठासीन अधिकारी अभिषेक कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. कुष्ठरोगी, अपंग व मनोरुग्णांना दरमहा एक हजार रुपये मानधन देण्याच्या विषयावर त्यातील तरतुदीत वाढ करावी, अशी मागणी बाळासाहेब बोराटे यांनी केली. रुग्णांचा प्रतिसाद मिळत नसलेले दवाखाने बंद करण्याऐवजी नवीन दवाखाने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. नेहरू मार्केटच्या जागेचा विषयही बोराटे यांनी उपस्थित केला. मोक्याच्या ठिकाणची जागा सव्वादोन कोटीत बिल्डरला कशी काय देता, त्यापेक्षा ती महापालिकेने विकसित करावी, अशी मागणी करत बोराटे यांनी प्रीमियम कमी कसा झाला, यावरून प्रशासनाला धारेवर धरले. साडेचार कोटीचा प्रीमियम सव्वादोन कोटीवर कसा, असा सवाल केला असता साडेचार कोटीच्या प्रीमियमचा ठरावच झाला नसल्याचा खुलासा प्रशासनाने केला. त्यास किशोर डागवाले यांनी आक्षेप घेतला. २०१० साली असा ठराव झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. बीओटीवर निविदा दाखल करण्यास प्रतिसाद मिळाला नाही. सहा वर्षे निविदेत गेल्यानंतर महापालिकेने मार्केट उभारणीसाठी काहीच केले नाही. तत्कालीन महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात मनपा निधी/बॅँक कर्जाचा पर्याय ठेवलेला होता. त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नसल्याकडे अनिल शिंदे यांनी लक्ष वेधले. चांगले कर्तृत्ववान अधिकारी महापालिकेकडे आहेत, महापौरही उच्चशिक्षित आहेत, त्यांच्या शिक्षितपणाचे पडसाद अर्थसंकल्पात उमटले पाहिजेत, अशी मागणी शिंदे यांनी केली. त्यावर बोलताना महापौर कळमकर यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही, कर्तृत्व काय करणार? अशी हतबलता व्यक्त केली. सहा वेळेस निविदा मागवून प्रतिसाद मिळाला नाही, महापालिकेने मार्केट बांधण्याचा एक प्रयत्न करण्यास हरकत नाही, असे डागवाले यांनी सभागृहात सांगितले. युतीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला.