शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराने झोडपले दक्षिण जिल्ह्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 22:13 IST

अहमदनगर : पावसाच्या उत्तरा नक्षत्राने दक्षिण जिल्ह्याला चांगलेच झोडपले. नगरसह, पाथर्डी, नेवासा आणि राहुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. बुधवारी झालेल्या जोराच्या पावसाने पुन्हा नद्या, तलाव तुडुंब भरले आहेत. दुसरीकडे बाजरी, उडीद, सोयाबीन, कपाशी, कांदा पिकाचे या पावसाने नुकसान झाले आहे. आठवड्यापासून सलग पाऊस सुरू आहे.

अहमदनगर : पावसाच्या उत्तरा नक्षत्राने दक्षिण जिल्ह्याला चांगलेच झोडपले. नगरसह, पाथर्डी, नेवासा आणि राहुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. बुधवारी झालेल्या जोराच्या पावसाने पुन्हा नद्या, तलाव तुडुंब भरले आहेत. दुसरीकडे बाजरी, उडीद, सोयाबीन, कपाशी, कांदा पिकाचे या पावसाने नुकसान झाले आहे.आठवड्यापासून सलग पाऊस सुरू आहे. त्यात मंगळवार, बुधवारी नगरसह दक्षिण जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. आधीच्या पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. तलाव, बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. नद्यांमधूनही दुथडी भरून पाणी वाहत आहे. त्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा एकदा नद्या, बंधाºयांमधून पाणी वाहू लागले आहे. बुधवारी जिल्ह्यात झालेला पाऊस मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. अहमदनगर (१३.८), पारनेर (१८.१), श्रीगोंदा (१८.१), कर्जत (१०.९), जामखेड (१८.०),शेवगाव (६.७),पाथर्डी (२७.२), नेवासा (२१.२), राहुरी (२९.५), संगमनेर (५.३), अकोले (३.५),कोपरगाव (६.४),श्रीरामपूर (८.९), राहाता (५.९), सरासरी (१३.४). गुरुवारी आणि शुक्रवारी नगर जिल्ह्यात वादळी वाºयासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

-----------आतापर्यंत सरासरी ६३९ मि.मी. पाऊसजिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६३९ मि.मी. पाऊस झाला आहे. पावसाची ही टक्केवारी सरासरी १६६ टक्के आहे.  गतवर्षी याच तारखेपर्यंत सरासरी ३८५ मि.मी., तर १०० टक्के पाऊस झाला होता. यंदाचा पाऊस आतापर्यंत दीडपटीच्या पुढे आहे. ------------धरणे ओव्हरफ्लोगुरुवारी सायंकाळपर्यंत धरणांमधून पाण्याचा सुरू असलेला विसर्ग पुढीलप्रमाणे आहे. ओझर बंधारा- १,०४ क्युसेक, नांदुर मधमेश्वर- १६१४ क्युसेक, जायकवाडी धरण-९४३२ क्युसेक, दौंड पुलावरून भीमा नदी-४८३४ क्युसेक, घोड धरण-४३४५ क्युसेक, मुळा धरण-७००० क्युसेक, सीना धरण-५३० क्सुसेक.----------

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस