शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीमधून सीनासाठी पाणी नाहीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 17:40 IST

शासनाने कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात सोडण्यास परवानगी दिली. सीना धरणात पाणी सोडण्यासाठी बोगदाही झाला.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : शासनाने कुकडी प्रकल्पातील ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात सोडण्यास परवानगी दिली. सीना धरणात पाणी सोडण्यासाठी बोगदाही झाला. मात्र २००५ च्या कायद्यानुसार महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने सीना धरणात सिंचनासाठी कुकडीचे पाणी सोडण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत सीना धरणाचा पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहेसीना प्रकल्पामधे कुकडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करणारी राज्य शासनाच्या विरोधातील याचिका अ‍ॅड. कैलास शेवाळे, अ‍ॅड. शिवाजी अनुभले, मिलींद बागल यांनी केली होती.याचिकेचा निर्णय १५ जुलै १९ रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला. या याचिकेवर निर्णय देताना प्राधिकरणाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. परंतु पूर्वीचे १.२ टीमसी पाणी काढून घेतले. त्यामुळे सीना धरणात शेतीसाठी सोडले जाणारे कुकडीचे पाणी यापुढे बंद होणार आहे. फक्त उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली तरच कुकडीचे १०० एमसीएफटी पाणी सीना धरणात सोडले जाणार आहे. त्यामुळे सीनाचा पाणी प्रश्न सुटण्याऐवजी अडचणीचा झाला आहे.सीना प्रकल्पामधे कुकडी डाव्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे १.२ टीमसी पाणी सोडण्यासाठी भोसे खिंड बोगदा प्रकल्प शासनाने राबविला. त्यास पाणी उपलब्ध नाही.त्यानंतर शासनाने श्वेत पत्रिका काढली व विशेष तपासणी पथक नेमले. या पथकाच्या अहवालानुसार भोसे खिंड बोगदा दोषयुक्त प्रकल्पाच्या यादीत गेला आहे.पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी हा बोगदा प्रकल्प कुकडी प्रकल्पास समावेश करणेसाठी प्रयत्न केला. किमान ०.४ टीमसी पाणी समावेश कुकडी प्रकल्प अहवालात तरतुद करणेबाबत प्रयत्न केले. झाले उलटे शासनाने फक्त ०.१ टीमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. याचीकाकर्त्यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या कोर्टात धाव घेतली. ०.१ टीमसी पाणी जाऊन फक्त टंचाई काळात पिण्याच्या पाण्यावर बोळवण झाली. प्रा. राम शिंदे तसेच याचिकाकर्त्यांचे प्रयत्न जरी प्रामाणिक असले तरी अर्धवट माहितीच्या आधारे अहवाल सादर करण्यात आले. पूर्वी मंजुर होते ते पाणी पण नवीन कायद्याच्या माध्यमातून कमी झाले आहे.विसापूर व साकळाई अडचणीतमहाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नवीन धोरणानुसार १०० उपलब्ध असेल. सिंचनासाठी पाणी दिले जात आहे. शासनाने राजकीय मतपेटी डोळ्यासमोर ठेऊन उचल अथवा कालव्यांना पाणी देण्यावर धोरण घेतले. तर त्यांना ब्रेक लावले जात आहे. भविष्यात विसापूर खालील सिंचन धोक्यात येणार आहे तर साकळाईचा जन्म होणे अवघड आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा