शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थ्यांना गणवेशाचे गाजरच; बूट, मोजेही येईनात

By चंद्रकांत शेळके | Updated: July 21, 2023 20:23 IST

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेमधून शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या सर्व मुली, तसेच अनुसूचित जाती-जमातींची सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो.

अहमदनगर : शासनाच्या गणवेश योजनेनुसार विशिष्ट प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. परंतु विद्यार्थ्यांमध्ये भेदभावाची भावना राहू नये म्हणून सर्वच मुलांना गणवेश देण्यासह यंदा विद्यार्थ्यांना बूट व मोजेही देण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु शासन आदेशानंतर १५ दिवस लोटले तरी याचे अनुदान शाळा व्यवस्थापन समित्यांकडे वर्ग झालेले नाही. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या पायात बूट कधी येणार, याची प्रतीक्षा पालकांसह सर्वांनाच आहे.

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनेमधून शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या सर्व मुली, तसेच अनुसूचित जाती-जमातींची सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. सद्य:स्थितीत संबंधित शाळांमधील केवळ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळत नव्हता. या विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश योजना लागू करण्यासह एक जोडी बूट, दोन जोडी पायमोजे देण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. ६ जुलैला त्याबाबत शासन निर्णयही निघाला. त्याची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासूनच (२०२३-२४) करायची होती.

मात्र, अद्याप त्याअनुषंगाने काहीच कार्यवाही झालेली नाही. नियमित पात्र विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला असताना उर्वरित विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. शिवाय सर्वांनाच बूट व पायमोजाचीही प्रतीक्षा आहे.शाळा व्यवस्थापन समितीकडून खरेदीमोफत गणवेश योजनेंतर्गत दोन गणवेशांसाठी प्रतिविद्यार्थी सहाशे रुपये याप्रमाणे अनुदान शिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग गेले जाते. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती गणवेश खरेदी करून मुलांना वाटप करते.१७० रुपयांत बूट खरेदी होईल का?गणवेशाप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बूट आणि पायमोज्यांचे दोन जोड खरेदी करण्यासाठी प्रतिविद्यार्थी १७० रुपये निधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळा व्यवस्थापन समितीकडेच देण्यात येणार आहे. दुसरीकडे महागाई लक्षात घेता १७० रुपयांत बूट व मोजे खरेदी कसे करायचे? असा प्रश्न पालकांना पडला आहे.जिल्ह्याला मिळाला दोन्ही गणवेशांचा निधीनगर जिल्ह्यात गणवेश योजनेंतर्गत जिल्हा परिषद, मनपा व कटक मंडळाच्या एकूण १ लाख ६२ हजार विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो. यात पहिल्या गणवेशापोटी साडेचार कोटींचा निधी दीड महिन्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समित्यांकडे वर्ग झालेला होता. आता नुकताच दुसऱ्या गणवेशासाठी साडेचार कोटींची निधीही वर्ग झाला आहे, असा एकूण ९ कोटींचा निधी गणवेशापोटी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. परंतु उर्वरित दारिद्र्यरेषेवरील सुमारे १ लाख विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षाच आहे.

टॅग्स :Schoolशाळा