शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता नाही ना, मग हेलिकॉप्टरसाठी अनुदान द्या; माजी सैनिकाने मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 08:24 IST

शेवगाव तालुक्यातील सालवडगावपासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर हनुमानवस्ती आहे. या वस्तीवर ३५० लोकवस्ती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखरडगाव (जि.अहमदनगर) : वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने सालवडगाव (ता.शेवगाव) येथील हनुमान वस्तीवरील माजी सैनिकाने थेट मुख्यमंत्र्यांकडे हेलिकॉप्टर घेण्यासाठी अर्थसाह्याची मागणी केली आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. दत्तू भापकर असे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. 

शेवगाव तालुक्यातील सालवडगावपासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर हनुमानवस्ती आहे. या वस्तीवर ३५० लोकवस्ती आहे. मात्र, सालवडगावपासून हनुमान वस्तीवर जाण्यासाठी सध्या रस्ताच नाही. जुन्या ओढ्यातून एक कच्चा रस्ता होता. मात्र, त्यावरही बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, रस्त्याचे काम सुरू होऊ शकले नाही. हा केवळ दोन किलोमीटरचा पाणंद रस्ता आहे. 

शालेय विद्यार्थ्यांचेही  होतात हालnसालवडगाव येथील हनुमान वस्तीवर येण्या-जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, शाळेत मुलांना जाण्यासाठी व एखादी व्यक्ती आजारी असेल, तरी वेळेवर वैद्यकीय सुविधाही मिळत नाहीत. यासाठी येथील सेवानिवृत्त लष्करी जवान दत्तू भापकर  यांनी अनेक वेळा सरकारी दरबारी पाठपुरावा केला, परंतु त्यांनाही न्याय मिळालाच नाही. nअखेर त्यांनी वैतागून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मला रस्ता नसल्याने हेलिकॉप्टर घ्यायचे आहे. यासाठी मला सरकारी अनुदान द्यावे, अशी मागणी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे