शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा नको, साखरपुडा-हळद-लग्न एकाच दिवशी करावे; अहिल्यानगरमध्ये मराठा लग्न आचारसंहिता संमेलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 12:28 IST

रविवारी येथे  मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देवगड संस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित हाेते.

 

अहिल्यानगर : हुंडा घेणार नाही, देणार नाही, साखरपुडा, हळद व विवाह एकाच दिवशी, अनावश्यक खर्च नाही, डीजेला बंदी, मानपानाला फाटा, प्री वेडिंगचा डामडौल नाही, सासरी सुनेचा छळ होणार नाही, आदी २० कलमी लग्न आचारसंहितेची मराठा समाजातील प्रत्येक घटकातील ११ सदस्यांना शपथ देण्यात आली. 

रविवारी येथे  मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देवगड संस्थानचे प्रमुख भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार साहेबराव दरेकर आदी उपस्थित हाेते. जंगले महाराज शास्त्री संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी उद्योजक, समाजसेवक, वकील, डॉक्टर, महिला, शिक्षक, पत्रकार तसेच मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा उद्योजक लॉबी, छावा संघटना, आदींसह अनेक घटकातील प्रतिनिधींना आचारसंहिता अंमलबजावणीची शपथ देण्यात आली. 

अशी आहे आचारसंहिता लग्न सोहळा ३०० ते ५०० लोकांमध्येच करावा, प्री-वेडिंग बंद करावे, साखरपुडा, हळद व लग्न एकाच दिवशी करण्यात यावे, लग्नात हुंडा घेऊ नये, देऊ नये, डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य व लोक कलावंतांना संधी द्यावी. 

कर्ज काढून लग्न करू नयेत, नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा, लग्न सोहळ्यात फक्त वधू आणि वर पित्यानेच  फेटे बांधावेत. 

लग्नात सोन्याची वस्तू, गाड्यांच्या चाव्या देऊन देखावा करू नये, रोख स्वरूपात देण्याऐवजी पुस्तके द्यावीत, अन्नाची नासाडी थांबवावी, भांडी, फर्निचर न देता मुलीच्या नावाने एफडी करावी, सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रयत्न करावेत, लग्नानंतर मुलीच्या संसारात हस्तक्षेप नको, सासरच्या लोकांनी पैशासाठी सुनेचा छळ करू नये 

टॅग्स :marriageलग्नAhilyanagarअहिल्यानगर